जूनअखेर ‘जलयुक्त’ची कामे पूर्ण करा ः जिल्हाधिकारी द्विवेदी

जूनअखेर ‘जलयुक्त’ची कामे पूर्ण करा ः जिल्हाधिकारी द्विवेदी
जूनअखेर ‘जलयुक्त’ची कामे पूर्ण करा ः जिल्हाधिकारी द्विवेदी

नगर : ‘‘टंचाईग्रस्त गावांतील दुष्काळ हटून गाव जलसंपन्न व्हावे, या हेतूने जलयुक्त शिवार अभियान मागील पाच वर्षांपासून सुरू आहे. ‘जलयुक्त’ची जिल्ह्यात सहा हजार ३८० कामे सुरू आहेत. त्यांतील पाच हजार ५९७ कामे पूर्ण झाली आहेत, तर ७८३ कामे प्रगतिपथावर आहेत. ‘जलयुक्त’चे काम अव्वल दर्जाचे करू या. त्यासाठी उर्वरित कामे जूनअखेर पूर्ण करा, कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही,’’ असा इशाराच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला. 

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. ४) जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन, फळबागा आदींसंदर्भात आढावा बैठक झाली. ही बैठक तब्बल चार तास सुरू होती. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वनाधिकारी कीर्ती जमदाडे-कोकाटे, वन विभागाचे रमेश देवखिळे आदी या वेळी उपस्थित होते. द्विवेदी यांनी जलयुक्त शिवार अभियानातील विविध कामांचा आढावा घेतला. 

ते म्हणाले, ‘‘जलयुक्त शिवार अभियानासाठी निवडलेली काही कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. त्यातील तांत्रिक अडचणींची तत्काळ पूर्तता करून जूनअखेर एकही काम अपूर्ण राहता कामा नये. अभियानातील कामे वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे, जेणे करून पावसामुळे अधिकाधिक पाणी साठून त्याचा उपयोग होईल. जे तालुके कामांच्या बाबतीत मागे आहेत, त्यांनी कामांचा वेग वाढवावा.’’

शेततळ्यांच्या कामात आघाडी  ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत कृषी विभागाला यंदा नऊ हजार २०० शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे. शेततळ्यांची उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे १३ हजार १३७ कामे सुरू आहेत. त्यांपैकी १२ हजार ५५५ कामे पूर्ण झाली आहेत. कृषी विभाग ही योजना राबविण्यात आघाडीवर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com