‘ताकारी’च्या पूर्णत्वासाठी ४९० कोटींची गरज

ताकारी उपसा सिंचन योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी कामे सुरू केली आहेत. लवकरच ही कामे पूर्ण होऊन या योजनेच्या लाभक्षेत्रातील सर्व शेतीला पाणी मिळेल. - प्रकाश पाटील,कार्यकारी अभियंता, ताकारी योजना
For the completion of 'Takari', the need is 490 crore
For the completion of 'Takari', the need is 490 crore

सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेसाठी सुधारित मान्यतेनुसार अंदाजे ११८० कोटी मिळाले आहेत. त्यापैकी ७५० कोटी खर्च झाला असून, ताकारी सिंचन योजना पूर्णत्वासाठी सुमारे ४९० कोटींची गरज आहे. जलसंपदा विभागाकडे या निधीची मागणी केली असून, निधी लवकर मिळेल. त्यानंतर लवकर अपूर्ण कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

ताकारी उपसा सिंचन योजनेअंतर्गत कडेगाव, पलूस, खानापूर आणि तासगाव तालुक्यांतील गावांचा समावेश येतो. या चार तालुक्यांतील शेतीला पाणी मिळते. या योजनेचे लाभक्षेत्र २७ हजार ४३० हेक्टर असून, १२ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. ताकारी योजनेचे एकूण चार टप्पे आहेत. या चार टप्प्यांतून कृष्णा नदीचे पाणी उचलले जाते. पहिल्या टप्प्यात दोन हजार अश्‍वशक्‍तीचे सोळा पंप आहेत. तर दुसऱ्या टप्प्यावरही दोन हजार अश्‍वशक्‍तीचे सोळा पंप आणि तिसऱ्या टप्प्यांवर एक हजार दोनशे पन्नास अश्‍वशक्‍तीचे चार पंप आहेत व चौथ्या टप्प्यांवर दोनशे पन्नास अश्‍वशक्‍तीचे तीन पंप आहेत.

आत्तापर्यंत या योजनेचे १०८ किलोमीटर लांबीचा मुख्य कालवा, तसेच ११ किलोमीटर लांबीचा चिंचणी भरण कालवा, २३ किलोमीटर लांबीचा सोनसळ डावा कालवा तडसर हद्दीपर्यंत यासह योजनेचे ४ टप्पे, भूसंपादन आदी कामांसाठी ७०० कोटी इतका खर्च झाला आहे. तर १०८ ते १४४ किलोमीटर अशा ३६ किलोमीटर अंतरातील मुख्य कालवा तसेच चिंचणी भरण कालवा अस्तरीकरण, सोनसळ डावा कालवा, वितरिका आणि उपवितरिका कामे अद्याप अपूर्ण आहेत. 

योजनेचे एकूण ४० ते ४५ किलोमीटरचे कालव्याचे लायनिंग व बहुतांश अस्तरीकरणाचे काम अपूर्ण आहे. कडेगाव तालुक्यातील देवराष्टे, कुंभारगाव व खानापूर तालुक्यांतील जधावनगर, बलवडी तसेच पलूस तालुक्यातील कुंडलचा काही भाग व कोयना वसाहत, पलूस व आंधळी आदी गावांच्या २४०४ हेक्टर लाभक्षेत्राला बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी देण्यासाठी ११ कोटी ८२ लाख इतक्या खर्चाच्या ताकारी योजनेच्या वितरिका क्रमांक २ चे काम आता सुरू आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com