'दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्‍यांतील पाणीपुरवठा योजना पूर्ण करणार'

पाणीपुरवठा योजना पूर्ण करणार
पाणीपुरवठा योजना पूर्ण करणार

सोलापूर : ‘‘दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्‍यांतील मुख्यमंत्री पेयजल योजनेतील चार आणि राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत २१ गावांचा समावेश आहे. या गावांचा पाणीपुरवठा तातडीने सुरू होण्यासाठी अपूर्ण असलेल्या योजना पूर्णत्वास आणण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू, कोणत्याही परिस्थितीत या योजना पूर्ण करू,’’ असे आश्‍वासन पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकारातून दक्षिण आणि उत्तर सोलापुरातील पाणीपुरवठा योजनासंबंधी नुकतीच लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या गावांमधील पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत, अपूर्ण योजना पुढील महिन्यात सुरू करून या गावांना सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी निधीची कमतरता नाही, असे मंत्री लोणीकर यांनी स्पष्ट केले. या बैठकीस संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सहकारमंत्री देशमुख यांनी उत्तर-दक्षिण सोलापुरातील पाणीपुरवठा योजनांची सद्यःस्थिती आणि निर्माण झालेली पाणीटंचाई, याचा आढावा आणि कुंभारी गावासाठी विस्तारीत पाणीपुरवठा योजना, मंद्रुप येथील पाणीटंचाई, याची माहिती देऊन या योजना तातडीने सुरू करण्याची विनंती केली. या पाणीपुरवठा योजना अपूर्ण असणे, ही गंभीर बाब असून, या कामात दिरंगाई करणाऱ्यावर कारवाई करावी, या कामांसाठी लागणारा आवश्‍यक निधी दिला जाईल, असे लोणीकर यांनी या वेळी सांगितले.

जिल्हा परिषद सदस्य अण्णाराव बाराचरे, पंचायत समिती सदस्य एम. डी. कमळे, प्राचार्य विश्रांत गायकवाड, ॲड. राजशेखर कोरे, कुंभारीचे सरपंच सिद्धाराम इमडे, दक्षिण सोलापूर सरपंच संघटनेचे अध्यक्ष पंडित अंबारे, भाजप जिल्हा सरचिटणीस हणमंतराव कुलकर्णी, शिरीष पाटील, तालुका सरचिचणीस यतीन शहा, हत्तूरचे सरपंच धर्मा राठोड, मधुकर चिवरे (वडजी), सिंदखेडचे सरपंच शकील मकानदार, संदीप राठोड (मुळेगांव), प्रधान गुरव (इंगळगी), लवंगीचे सरपंच गुरुनाथ बंदलगी आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com