नगर जिल्ह्यात ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

केंद्र सरकारने केलेले तीनही कृषी विधेयके रद्द करावीत, या मागणीसाठी आज पुकारलेल्या भारत बंदला नगर जिल्ह्यातउत्स्फूर्तप्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. दुपारी बंद संपल्यानंतरही लोकांनी दिवसभर बंद पाळला.
Composite response to 'Bandh' in Nagar district
Composite response to 'Bandh' in Nagar district

नगर ः केंद्र सरकारने केलेले तीनही कृषी विधेयके रद्द करावीत, या मागणीसाठी आज पुकारलेल्या भारत बंदला नगर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. दुपारी बंद संपल्यानंतरही लोकांनी दिवसभर बंद पाळला. 

केंद्र सरकारने केलेले तीनही कृषी विधेयके रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देत भारत बंद पाळण्यात आला. नगर शहरात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी पुणे-नगर रस्त्यावर बाजार समित्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बाजार समितीत लिलाव सुरू होते. मात्र, धान्य, भाजीपाल्याची फारशी आवक झाली नाही.

कोपरगाव तालुक्यातील विविध शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व शिवसेना पक्षाच्या वतीने आज पुकारलेल्या बंदला नागरिकांसह व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली. शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील अमरापूर, ढोरजळगाव, दहिगाव, शहरटाकळी, घोटण, खानापूर या गावातील व्यवहार बंद होते. शेतात सध्या सुरू असलेले खरिपाची तूर काढणी, कापूस वेचणी तर रब्बी पिकाच्या मशागतीचे कामे, ऊस लागवड, खुरपणी अशी कामे सुरू आहेत. भारतातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाबाबत शेतातील कामे बंद करून आंदोलनात सहभाग घेतला. शेतात बसून कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. शेवगाव शहरात व्यापाऱ्यांनी बंद पाळून निषेध केला. पुणतांबा येथे बंद पाळण्यात आला.

बंदला संगमनेर शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून चांगला प्रतिसाद दिला. मात्र, तालुक्यातील गावांमध्ये बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. जवळपास सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळाली. तसेच बँका व इतर व्यवहार सुरू असल्याने रस्त्यावरील दुचाकी, चारचाकी वाहनांसह एसटीबस वाहतूक सुरू होती. अकोले येथे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली बंद पाळण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com