भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात संमिश्र यश
परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता. १८) झाली.जिल्ह्यात विविध पक्षांच्या पॅनेलना संमिश्र यश मिळाल्याचे चित्र आहे.
परभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता. १८) झाली.जिल्ह्यात विविध पक्षांच्या पॅनेलना संमिश्र यश मिळाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बोरी (ता. जिंतूर) ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ता राखली. झरी (ता. परभणी) ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे पुर्नरागमन झाले. ग्रामपंचायतीतील विजयाबद्दल दावे प्रतिदावे केले जात आहेत. अनेक ठिकाणच्या निकालावर स्थानिक नेतेमंडळींसह आमदारांचा प्रभाव दिसून येत आहे.
परभणी जिल्ह्यात ५६६ पैकी ६८ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे शुक्रवारी (ता. १५) नऊ तालुक्यांतील ४९८ ग्रामपंचायतींसाठी १ हजार ५७३ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले.जिल्ह्यातील ८ हजार ७१७ उमेदवारांनी निवडणूक लढवली. जिल्ह्यातील ६ लाख ७२ हजार ८५६ पैकी ५ लाख ५८ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सोमवारी (ता. १८) मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाले. विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
झरी, बोरी, चारठाणा, वालूर आदी मोठ्या तसेच अन्य काही ग्रामपंचायतीमध्ये चुरशीच्या लढती झाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी बोरी ग्रामपंचायतीमधील सत्ता कायम राखली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांच्या पॅनेलला मांडाखळी ग्रामपंचायतीत विजय मिळाला. झरी ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच गजानन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पॅनेलला बहुमत मिळाले.
वालूर ग्रामपंचायतीत जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय साडेगावकर यांच्या पॅनेलला विजय मिळाला. चारठाणा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नानासाहेब राऊत यांच्या तसेच भाजपच्या पॅनेलला प्रत्येकी सात जागा मिळाल्याने सत्तेची चावी शिवसेना तसेच अन्य उमेदवारांच्या हाती गेली. जिंतूर, सेलू तालुक्यातील अनेक ग्रामपंचातीत भाजपला त्यापाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश मिळाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजप, कॉंग्रेस तसेच काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, भाकप प्रणीत पॅनेलला यश मिळाल्याचे चित्र आहे.