Agriculture news in Marathi Composite success in Parbhani district | Page 2 ||| Agrowon

परभणी जिल्ह्यात संमिश्र यश

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जानेवारी 2021

परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता. १८) झाली.जिल्ह्यात विविध पक्षांच्या पॅनेलना संमिश्र यश मिळाल्याचे चित्र आहे.

परभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता. १८) झाली.जिल्ह्यात विविध पक्षांच्या पॅनेलना संमिश्र यश मिळाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बोरी (ता. जिंतूर) ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ता राखली. झरी (ता. परभणी) ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे पुर्नरागमन झाले. ग्रामपंचायतीतील विजयाबद्दल दावे प्रतिदावे केले जात आहेत. अनेक ठिकाणच्या निकालावर स्थानिक नेतेमंडळींसह आमदारांचा प्रभाव दिसून येत आहे.

परभणी जिल्ह्यात ५६६ पैकी ६८ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे शुक्रवारी (ता. १५) नऊ तालुक्यांतील ४९८ ग्रामपंचायतींसाठी १ हजार ५७३ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले.जिल्ह्यातील ८ हजार ७१७ उमेदवारांनी निवडणूक लढवली. जिल्ह्यातील ६ लाख ७२ हजार ८५६ पैकी ५ लाख ५८ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सोमवारी (ता. १८) मतमोजणीनंतर निकाल  जाहीर झाले. विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

झरी, बोरी, चारठाणा, वालूर आदी मोठ्या तसेच अन्य काही ग्रामपंचायतीमध्ये चुरशीच्या लढती झाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी बोरी ग्रामपंचायतीमधील सत्ता कायम राखली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांच्या पॅनेलला मांडाखळी ग्रामपंचायतीत विजय मिळाला. झरी ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच गजानन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पॅनेलला बहुमत मिळाले.

वालूर ग्रामपंचायतीत जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय साडेगावकर यांच्या पॅनेलला विजय मिळाला. चारठाणा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नानासाहेब राऊत यांच्या तसेच भाजपच्या पॅनेलला प्रत्येकी सात जागा मिळाल्याने सत्तेची चावी शिवसेना तसेच अन्य उमेदवारांच्या हाती गेली. जिंतूर, सेलू तालुक्यातील अनेक ग्रामपंचातीत भाजपला त्यापाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश मिळाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजप, कॉंग्रेस तसेच काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, भाकप प्रणीत पॅनेलला यश मिळाल्याचे चित्र आहे.

 


इतर ताज्या घडामोडी
निरा-भाटघरच्या कालवा दुरुस्तीसाठी ...सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील निरा...
नवीन बाग लागवडीचे नियोजनएकदा लागवड झाली, की पुढील १२ ते १४ वर्षे वेल...
मिरचीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनमिरची हे प्रमुख भाजीपाला पीक आहे. या पिकाची कमी...
भाजीपाला पिकावरील कीडनियंत्रणकाकडीवर्गीय भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज, कांदा,...
औरंगाबाद, जालना, लातूरमध्ये हरभरा...लातूर : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व लातूर या...
शेतकरी नियोजन पीक : डाळिंबनातेपुते (ता. माळशिरस) येथे माझी ६० एकर शेती आहे...
वारस नोंदीचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण...सोलापूर ः जिल्ह्यात रखडलेले वारसनोंदीचे काम...
सोलापूर बाजार समितीत तपासणीशिवाय...सोलापूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर कृषी...
मोसंबी केंद्राच्या रोपवाटिकेची...बदनापूर, जि. जालना : ‘‘राष्ट्रीय पातळीवरील...
राज्यातील १००० तरुणांना पर्यटन...पुणे ः पर्यटनातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था...
नुकसानभरपाईच्या निर्णयाची अंमलबजावणी...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात खरीप...
बुलडाण्यात एक लाख ८७ हजार क्विंटल...बुलडाणा ः यंदाच्या हंगामात शासनाने भरड धान्य...
‘पणन’ची कापूस खरेदीला मुदतवाढनागपूर : राज्यात २८ फेब्रुवारी पासून कापूस खरेदी...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाचे...परभणी ः जिल्ह्यात यावर्षी गुरुवार (ता.२५) पर्यंत...
चांदोली धरणात २५.७२ टीएमसी साठाशिराळा, जि. सांगली ः चांदोली धरणाची पाणीसाठा...
‘सीताई’कडून ‘शेतकरी ते ग्राहक’ थेट...सोलापूर ः सीताई नॅचरल फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या...
रत्नागिरी : गारपिटीचा आंबा बागांना फटकारत्नागिरी ः पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार...
शेतकरी सन्मान योजना कृषी विभागाकडे वर्ग...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना पूर्णपणे...
वैधानिक मंडळावरून विदर्भातील नेते आक्रमकनागपूर : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
हिंगोली जिल्ह्यास हळद क्लस्टर जाहीर करा...हिंगोली : ‘‘राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये हिंगोली...