ठाकरे स्मार्ट योजनेतून शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास

नाशिक : तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्याचा सर्वांगिण विकास हेच शासनाचे लक्ष असून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेतून शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास साधणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केले.
 Comprehensive development of farmers through Thackeray Smart Scheme
Comprehensive development of farmers through Thackeray Smart Scheme

नाशिक : तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्याचा सर्वांगिण विकास हेच शासनाचे लक्ष असून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेतून शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास साधणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी  केले.

महाडीबीटीच्या कृषी यांत्रिकीकरण अभियान २०२०-२१ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कृषी अवजारे वाटपाचा प्रारंभ शनिवार (ता. ६)श्री.भुसे यांच्या हस्ते बारीपाडा (ता. साक्री) येथे करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार मंजुळाताई गावित, चैत्राम पवार, पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, सरपंच सुनीता बागूल, अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी पी. एम. सोनवणे, तालुका कृषी अधिकारी सी. के. ठाकरे, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले, की सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. बारीपाड्याला लाभलेल्या नैसर्गिक देणगीचे संवर्धन उत्तम प्रकारे करण्यात आले आहे. जुन्या बियाण्याचे जतन व संवर्धन करून चांगला उपक्रम राबविला आहे. हा उपक्रम अनुकरणीय असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी देशबंधू ॲग्रो रिसर्च कंपनीच्या आढावा बैठकीत कंपनीच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला.सर्व सदस्यांशी संवाद साधत कंपनीच्या प्रगतीचा सर्व लेखाजोखा त्यांनी जाणून घेत त्यांच्या अडचणी व समस्याही त्यांनी यावेळी जाणून घेतल्या. 

पीक कर्जापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देतांना, मत्सपालनासाठी स्थानिक आदिवासी शेतकरी बांधवांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘विकेल ते पिकेल’ ही संकल्पना यशस्वी ठरत आहे. शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना शेतमाल विक्रीसाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

महाडिबीटीच्या अनुषंगाने आता एक पानी अर्ज महाडिबीटीच्या अनुषंगाने आता प्रत्येक शेतकऱ्याला केवळ एक पानी अर्ज एकदाच सादर करावा लागणार असून विविध योजनेसाठी वारंवार अर्ज सादर करण्याची गरज यापुढे भासणार नसल्याचेही कृषिमंत्री श्री. भुसे यांनी नमूद केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com