खत विक्रेत्यांना युरिया खरेदीवर ‘लिंकिंग’ची सक्ती

urea
urea

दोंडाईचा, जि. धुळ ः जिल्ह्यात नुकतेच एका कंपनीचे १८०० टन संयुक्त व ७५० टन युरिया दाखल झाले. परंतु, आपल्या वितरकांना युरिया देताना इतर खतांच्या लिंकिंगची सक्ती कंपनीने केल्याची माहिती आहे. परिणामी, खतविक्रेत्यांनाही शेतकऱ्यांना युरिया विक्री करताना लिंकिंग करावी लागेल. कृषी विकास अधिकाऱ्यांनी यासंदर्भात लक्ष घालून संबंधितांना सूचना द्याव्यात, अशी मागणी खत विक्रेत्यांनी केली आहे. जलसाठे वाढल्यामुळे यंदा रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. अनेक खत विक्रेत्यांकडे युरियासह अन्य खते उपलब्ध असताना जर शेतकऱ्याने युरियाची मागणी केली, तर यासोबत आणखी काय पाहिजे, असा प्रश्न खत विक्रेता करतो. केवळ युरिया मागितल्यावर शिल्लक नसल्याचे सांगून खत द्यायचे टाळले जात आहे. युरिया घेताना इतर विद्राव्य किंवा संयुक्त, अन्नद्रव्ये घेण्याची सक्ती शेतकऱ्यांना केली जात आहे.  युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करून ही लिंकिंग केली जात असल्याचा दावा शेतकरी करीत आहेत. याबाबत खत विक्रेते कंपन्यांकडे बोट दाखवीत आहेत. कंपन्यांकडून युरिया देताना लिंकिंग केली जाते. मग लिंकिंगवर मिळालेले खत कुठे ठेवायचे? त्यात मोठी गुंतवणूक झालेली आहे. खत कंपन्याच सक्ती करीत आहेत, असा आरोप खत विक्रेते करीत आहेत. तसेच, कृषी विभागाने या प्रकाराबाबत लक्ष द्यावे, असेही म्हणत आहेत. कंपनीचा वितरकांशी करार?  राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स कंपनीने वितरकाला सुफला, युरिया खताप्रमाणे जो काही उत्पादित माल असेल, तो विक्रीसंदर्भात कंपनी व वितरकांत लेखी करार झालेला असतो. सद्यःस्थितीत युरियापेक्षा सुफलाचा साठा जास्त आहे. कंपनीने दिलेल्या प्रोग्रॅमनुसार व वितरकांच्या मागणीप्रमाणे खताचे वितरण करतो. युरियासोबत सुफला घेण्याची सक्ती केलेली नाही, अशी माहिती आरसीएफचे जिल्हा विक्री अधिकारी सुरेश वराठा यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com