agriculture news in Marathi, computer system compulsory for fodder camp, Maharashtra | Agrowon

चारा छावणीत संगणकीय प्रणालीचा वापर करावाच लागेल

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 मे 2019

नगर: जनावरांच्या छावणीत जनावरांची जास्तीची संख्या दाखवून अनुदान लाटण्याचा प्रकार थांबवण्यासाठी जनावरांची नोंद संगणकीय प्रणालीत करावी, त्यासाठी जनावरांना बारकोड टॅगिंग, मोबाईल वापरातून स्कॅनिंग आदी बाबी करण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र छावणी चालकांनी त्याला विरोध केला आहे. ‘‘शासनाने हा नियम घालून दिला आहे. कोणत्याही परिस्थिती संगणकीय प्रणालीचा वापर करावाच लागेल,’’ असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट केले. जर संगणकीय प्रणालीचा वापर केला नाही, तर छावणीचालकांना अनुदानापासून मुकावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.  

नगर: जनावरांच्या छावणीत जनावरांची जास्तीची संख्या दाखवून अनुदान लाटण्याचा प्रकार थांबवण्यासाठी जनावरांची नोंद संगणकीय प्रणालीत करावी, त्यासाठी जनावरांना बारकोड टॅगिंग, मोबाईल वापरातून स्कॅनिंग आदी बाबी करण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र छावणी चालकांनी त्याला विरोध केला आहे. ‘‘शासनाने हा नियम घालून दिला आहे. कोणत्याही परिस्थिती संगणकीय प्रणालीचा वापर करावाच लागेल,’’ असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट केले. जर संगणकीय प्रणालीचा वापर केला नाही, तर छावणीचालकांना अनुदानापासून मुकावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.  

जनावरांच्या छावणीतील दाखल जनावरांची नोंद संगणकीय प्रणालीद्वारे करायची आहे. त्यासाठी प्रत्यक जनावराला बारकोड टॅगिंग करून ते मोबाईलमध्ये स्कॅनिंग करायचे आहे. त्यामुळे छावणीत असलेल्या जनावरांचा अचूक आकडा प्रशासनाला कळणार आहे. छावणीतील गैरव्यवहार, जास्तीची जनावरांची संख्या दाखवून अनुदान लाटण्याचा मात्र नगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच छावणीचालकांनी संगणकीय प्रणालीचा वापर करण्याला विरोध केला आहे.

राजकीय नेत्यांना सोबत काही छावणीचालकांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. मात्र ‘‘शासनाने हा नियम काढला आहे. त्यात काहीही बदल करता येणार नाही. संगणक प्रणालीचा वापर करावाच लागेल.’’ असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्प्ष्ट केलेय. शनिवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक झाली. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी या वेळी उपस्थित होते. 

चारा छावणी, रोजगार हमीची कामे आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आदी उपाययोजनांचा आढावा घेतला. पशुधनाची नोंद घेण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करावा, असे छावणीचालक संस्थांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पत्राद्वारे कळविले आहे. संगणक प्रणालीचा वापर केला नाही तर अनुदान मिळणार नाही, असे नमूद केले आहे. त्यामुळे छावणीचालक व त्यांची बाजू घेणारे नेते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. बुधवार (ता. १५) पासून संगणकीय प्रणालीचा वापर करायचा आहे.


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात गव्हाचा १ लाख ६८ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या...
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून...नागपूर  ः खासदार औद्योगिक महोत्सवाच्या...
अकोला कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे...अकोला  : ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण हे...
तीन जिल्ह्यांत तूर विक्रीसाठी २९...नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी,...
आळसंद येथील पशुवैद्यकीय दवाखाना उद्‌...आळसंद, जि. सांगली : आळसंद (ता. खानापूर) येथे...
तीन जिल्ह्यांत सतरा लाख ४१ हजार क्विंटल...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
जावळी तालुक्यात वन्यप्राण्यांकडून... मेढा, जि. सातारा : जावळी तालुक्‍यात...
कातळावरील गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कांदळगाव (ता. मालवण)...
सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांना सुविधा...नाशिक : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊन त्यांचा...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
बदलत्या हवामानात कृषी जैवविविधतेचे...संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषी जैवविविधता आणि अन्न...
हरितगृह वायू कोणते?मागील लेखामध्ये हरितगृह परिणाम म्हणजे काय, ते आपण...
जागतिक तापमानवाढीवर हरितगृह वायूंचा...सध्या सर्वत्र तापमानवाढीची चर्चा असली, तरी...
गिरणा परिसरात कांदा लागवडीकडे कलमेहुणबारे, जि. जळगाव  ः चाळीसगाव तालुक्‍यात...
घराघरांत पोचणार नळ कनेक्‍शन, बसणार मीटर...जळगाव  : जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला...
जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेतून...जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने महात्मा...
शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक कर्जमुक्तीचा...अकोला ः शेतकरी कर्जदार नसून तो भूमीचा राजा आहे....
केंद्राच्या पथकाकडून लासलगावला कांदा...नाशिक  : कांद्याचे घसरते बाजार भाव पाहता...
`रेशीम प्रकल्पाच्या मंजुरीसाठी...औरंगाबाद : राज्यातील रेशीम उद्योगाच्या एकूणच...
अमरावती येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना...अमरावती ः जिल्हा परिषदेत आठवड्यातील दोन दिवस...