वाढदिवसाला रुजतेय फळांचा केक वापरण्याची संकल्पना

मालेगाव कॅम्प, जि. नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून फळांची केक वापराची चळवळ विस्तारत आहे. त्याच अनुषंगाने मालेगाव येथे फळांच्या केक वापराची संकल्पना रुजत आहे.
The concept of using rooted fruit cake for birthdays
The concept of using rooted fruit cake for birthdays

मालेगाव कॅम्प, जि. नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून फळांची केक वापराची चळवळ विस्तारत आहे. त्याच अनुषंगाने मालेगाव येथे फळांच्या केक वापराची संकल्पना रुजत आहे. त्याला प्रतिसाद मिळत आहे. येथील कॉलनी मित्र मंडळाने ही संकल्पना कृतीतून अमलात आली आहे.

 भायगाव परिसरातील संकल्प नगर येथील वीज वितरणाच्या उप कार्यकारी अभियंता मुरलीधर साळुंखे यांच्या वाढदिवसाला फळांचा वापर करण्यात आला. प्रत्येक मित्राने प्रत्येकी एक फळ आणले होते. यातून फळांना मागणी वाढेल. 

बर्थडेला फळ संस्कृतीची जोड दिल्यास फळांना बाजार मिळेल. द्राक्षे, केळी, टरबूज-खरबूज अशा फळांना भाव मिळेल. फळे आहारात घ्यावीत, यासाठी हा प्रयत्न करण्यात येत आहे. या निमित्ताने शेतकरी कुटुंबातील घटकांसह सर्वांनी केकऐवजी फळे वापरण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

या वेळी स्वप्नील बच्छाव, संजय करंकाळ, श्याम बच्छाव, अमोल वाघ, अरुण अहिरे, रवी जाधव, संभाजी खेडकर, डॉ. भाऊसाहेब देवरे, डॉ. निवृत्ती सूर्यवंशी, नथुभाऊ शेलार, सुजित पाटील, उत्तम भवर, समाधान सोनवणे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com