Agriculture news in marathi; Concern among farmers over rainy weather in Akola | Page 2 ||| Agrowon

अकोला येथे पावसाळी वातावरणाने शेतकऱ्यांमध्ये चिंता
टीम अॅग्रोवन
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

अकोला ः गेल्या २४ तासांपासून या भागात पावसाळी वातावरण बनले असून अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. वाशीम जिल्ह्यात मंगरुळपीर येथे पावसामुळे बाजार समितीत विक्रीस आलेल्या सोयाबीन उत्पादकांची तारांबळ उडाली. 

अकोला ः गेल्या २४ तासांपासून या भागात पावसाळी वातावरण बनले असून अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. वाशीम जिल्ह्यात मंगरुळपीर येथे पावसामुळे बाजार समितीत विक्रीस आलेल्या सोयाबीन उत्पादकांची तारांबळ उडाली. 

सध्या खरिपातील सोयाबीन सोंगणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी (ता. १८) दुपारच्या सुमारास शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. त्यामुळे शेतकरी वर्गाची चांगलीच धांदल उडाली. विशेष म्हणजे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीस आणले होते. मात्र, सावधगिरीमुळे हे सोयाबीन ओले होण्यापासून वाचविता आले.

खरीप हंगामात तालुक्यात कोरडवाहू शेतीमध्ये प्रामुख्याने सोयाबीन -तूर या मिश्र पिकाला शेतकरी पसंती देतो. बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी टाकलेला सोयाबीनचा माल ओला होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. मात्र, बाजार समितीकडून तसेच शेतकऱ्यांनी सावधगिरी म्हणून सोयाबीनला ताडपत्र्यांद्वारे झाकले. त्यामुळे बहुतांश सोयाबीन ओले होण्यापासून वाचले. त्यानंतर पाऊस उघडल्यानंतर सोयाबीनची मोजणी पूर्ववत करण्यात आली. 
बुलडाणा जिल्ह्यात चिखली, मेहकर, मोताळा, अकोला जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी दिली. या रिमझिम पावसाने शेतीतील कामांवर विपरीत परिणाम झाला आहे. 

इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यकतणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे...
नगरमध्ये टोमॅटो ५०० ते २००० रुपये...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता...
संत नामदेव महाराजांच्या १७ व्या...पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री...
फळपीक सल्लायावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला....
कळमणा बाजारात सोयाबीन दरात घसरणनागपूर : गेल्या आठवड्यात सुधारलेल्या सोयाबीनच्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला १३०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर; बाजरीत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी...माणसाच्या आरोग्याला हानिकारक खाद्यविषयक सवयी...
वऱ्हाडात जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी...अकोला : मॉन्सूनोत्तर पावसाने मोठा...
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी...गडचिरोली  ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...
खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्‍क्‍...जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील...
भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्त...गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय...
कापूस खरेदीसाठी आर्द्रतेची मर्यादा...वर्धा  ः संततधार पावसामुळे या वर्षी कापसात...
'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे...भंडारा  ः शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड...
अमरावती विभागात विषबाधितांची संख्या...अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान...
देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या...नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील...
डाळिंब बागा वाचविण्यासाठी धडपडआटपाडी, जि. सांगली :  यंदा तालुक्यात रिमझिम...
सांगली जिल्ह्यात रब्बीतील पिकांची ६७...सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख क्विंटल...पुणे  ः यंदा पाऊस उशिरा झाल्याने पुणे...