agriculture news in marathi, Concerned by silk-producing farmers due to lack of subsidy | Page 3 ||| Agrowon

अनुदानाअभावी रेशीम उत्पादक शेतकरी चिंतेत
टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

बुलडाणा : बाजारपेठेतील दर, अाजवर शासनाचे मिळालेले पाठबळ यामुळे जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेतीत उतरत असताना या वर्षात लागवड केलेल्या सव्वाशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. शिवाय त्यांच्या अर्जांबाबत संभ्रम असून हे शेतकरी जिल्हास्तरापासून रेशीम संचालनालयापर्यंत पाठपुरावा करीत अाहेत.  

बुलडाणा : बाजारपेठेतील दर, अाजवर शासनाचे मिळालेले पाठबळ यामुळे जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेतीत उतरत असताना या वर्षात लागवड केलेल्या सव्वाशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. शिवाय त्यांच्या अर्जांबाबत संभ्रम असून हे शेतकरी जिल्हास्तरापासून रेशीम संचालनालयापर्यंत पाठपुरावा करीत अाहेत.  

बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या सिल्क समग्र योजनेअंतर्गंत तुती लागवड केली अाहे. त्यापूर्वी बुलडाणा जिल्हा रेशीम कार्यालय तसेच केंद्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यात वेळोवेळी बैठका घेत शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. ही योजना मनरेगामध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असून योजनेत दोन एकरापेक्षा कमी लागवड करता येणार नाही. अशी माहिती देऊन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून दोन ते पाच एकर लागवडीसाठी प्रतिएकर एक हजार रुपये नोंदणी शुल्क घेतले. शेतकऱ्यांचे प्रस्ताव तयार करून घेतले.

शेतकऱ्यांनी रेशीम खात्याने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार अापल्याकडे असलेले भांडवल व बागायती शेती ही रेशीम उद्योग लागवडीसाठी गुंतवणूक म्हणून वापरली. जिल्ह्यात १३४ शेतकऱ्यांनी ३२४ एकरावर लागवड केली. तुतीची चांगली वाढ झाली अाहे. मात्र, अद्यापपर्यंत लागवडीचे अनुदान दिलेले नाही. तसेच पुढील योजनांना ठिबक सिंचन, कीटक संगोपन गृह व कीटक संगोपनासाठी साहित्य, यासाठी शेतकऱ्यांकडून प्रस्तावही तयार करून घेण्यात अालेले नाहीत. दरम्यानच्या काळात १५ अाॅक्टोबरला या कार्यालयाने अचानक शुद्धिपत्रक काढत २९ अाॅक्टोबरपर्यंत प्रस्ताव देण्याचे सांगितले. अाता लाभार्थी शेतकऱ्यांची निवड ही सोडतीद्वारे होईल, असे सांगण्यात येत आहे.  

लाभार्थी निवडण्यासाठी सोडत पद्धत अाधीच निश्चित करण्याची गरज होती, असे रेशीम उत्पादक प्रमोद पाटील (तपोवन), अरुण केनकर (बुलडाणा), संजय येऊल (जळगाव जामोद), श्रीकृष्ण शेलकर (डिडोळा) या शेतकऱ्यांनी रेशीम संचालनालयाच्या संचालकांना दोन दिवसांपूर्वी निवेदनाद्वारे कळविले आहे. 

रेशीम उत्पादकांच्या मागण्या

  •     तुती लागवड, ठिबक सिंचन, कीटक संगोपन गृह व साहित्य योजनेचा पूर्ण लाभ द्यावा.
  •     निधीसाठी केंद्र व राज्यशासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून द्यावा
  •     उपलब्ध निधीतून शेतकऱ्यांना लवकर अनुदान तातडीने द्यावे.

इतर ताज्या घडामोडी
सात हजार जलस्रोतांचे होणार चंद्रपूर...चंद्रपूर ः ग्रामपंचायत क्षेत्रातील सार्वजनिक...
राधाकृष्ण विखे-थोरात यांच्यात रंगणार...नगर ः राज्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेत...
नगर जिल्ह्यात दक्षिणेत दुष्काळ अन्‌...नगर ः उत्तरेतील भंडारदरा, मुळा, निळवंडे, आढळा...
जनावरांच्या मृत्यूने धनगरवाडा चिंतेतढेबेवाडी, जि. सातारा : धनगरवाडा (कसणी, ता. पाटण)...
माण तालुक्यात कांदा काढणी वेगातगोंदवले, जि. सातारा : निवडणुकीच्या सुगीतच शेतीची...
विद्यार्थिनीशी गैरवर्तणूकप्रकरणी दोन...नागपूर ः विद्यार्थिनीशी गैरवर्तणूक करण्याचा...
मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांतील १०६...लातूर : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नांदेड, परभणीत ऊस लागवडी वाढण्याची...नांदेड ः गतवर्षीच्या तुलनेत जास्त पाऊस झाल्यामुळे...
नांदेड : परतीच्या पावसाने सोयाबीनचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे...
परभणीत वांगी प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
बागलाण तालुक्यातील वादळाने द्राक्ष...नाशिक : पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादकांचा भाग...
लाल कांदा लागवड खानदेशात घटलीजळगाव ः खानदेशात खरिपातील लाल कांद्याची लागवड...
नव्या हंगामातील पपई लवकरच बाजारात;...जळगाव  ः नव्या हंगामातील पपईची काढणी येत्या...
शासकीय हमीभाव केंद्र सुरू करा ः सोयाबीन...दारव्हा, यवतमाळ  ः बाजारात नव्या सोयाबीनची...
सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाचा जोर कायमसिंधुदुर्ग : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. सलग...
जत सीमा भागाला कर्नाटकातून पाणी देणार...जत, जि. सांगली : ‘‘दुष्काळी जत तालुक्‍याच्या...
‘मार्केट यार्डातून हळद न उचलणाऱ्या...हिंगोली : ‘‘हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
मोदींच्या चुकीच्या धोरणांची किंमत...अकोला ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवीत...
गुजरातच्या सोईचे निर्णय घेतले जातात ः...यवतमाळ : गुजरातकडून येणाऱ्या सूचनांचेच पालन...
दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा आमचा अजेंडा...सोलापूर ः सोलापूरसह अन्य नजीकच्या जिल्ह्याला...