जागतिक पातळीवर कापूस उत्पादनात घटीने चिंता

जागतिक पातळीवर कापसाच्या उत्पादनात घटीचे अंदाज असल्याने कापूस उपलब्धता आणि दराविषयी बांगलादेश कॉटन असोसिएशनने चिंता व्यक्त केली आहे. यंदा कापूस मागणी आण पुरवठ्यात तूट येण्याची शक्यता आहे.
Concerns over declining global cotton production
Concerns over declining global cotton production

पुणे : जागतिक पातळीवर कापसाच्या उत्पादनात घटीचे अंदाज असल्याने कापूस उपलब्धता आणि दराविषयी बांगलादेश कॉटन असोसिएशनने चिंता व्यक्त केली आहे. यंदा कापूस मागणी आण पुरवठ्यात तूट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेडिमेड कापड निर्यातदारांनी दरवाढीबाबत सजग राहून कापसाच्या ऑर्डर्स घेताना हा मुद्दा लक्षात घेऊनच वाटाघाटा करावी, असे आवाहन बांगलादेश कॉटन असोसिएशनने केले आहे. 

बांगलादेशातून कापडाची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते. त्यामुळे येथील उद्योगावर कापूस टंचाई आणि वाढत्या दराचा थेट परिणाम होऊन शकतो, अशी भीती व्यक्त करत सरकारने कापूस उत्पादक देशांत बांगलादेशी मिशन राबवावे, विशेष करून आफ्रिकी देशावर लक्ष केंद्रित करावे. तसेच मानव निर्मित कापड उत्पादनात देशी तसेच विदेशी गुंतवणूक वाढवावी, अशी मागणी बांगलादेश कॉटन असोसिएशनने केली आहे. तर रेडिमेड कापड क्षेत्रातील व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही आधीच निर्यातदरांकडून दर पाडून निर्यातीची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक कापडाचा किमान बेंचमार्क दर ठेवला आहे.

बांगलादेश नाइटवेअर मॅन्युफॅक्चरर्स अॅन्ड एक्स्पोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद हातेम यांनी सांगितले, की कमी कापसाचे दर वाढले त्या प्रमाणात कापड खरेदीदार दर देत नाहीत. त्यामुळे उद्योग सापडला आहे. सरकारने या काळात ठोस पावले उचलून उद्योगाला दिलासा द्यावा. 

दर स्थिर ठेवण्यावर भर बांगलादेश टेक्स्टाइल मिल्स असोसिएशनचे उपाध्यक्ष फझलूल हक यांनी सांगितले, की कापसाच्या दरावर आमचे नियंत्रण नाही आणि कापसाच्या तुलनेत सुताचे दर कमी वाढलेले आहेत. कापसातील वाढ अधिक आहे. बांगलादेश टेक्स्टाइल मिल्स असोसिएशनने सर्व घटकांसोबत चर्चा करून सुताचे दर निश्‍चित केले आहेत आणि सभासद मिल्सना हे दर ३० नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवण्याची विनंती केली आहे. तसेच डिसेंबरमध्ये कापसाच्या दराबरोबरच सुताचेही दर वाढतील, अशी माहिती कापड निर्यातदारांनी दिली आहे. 

आयातशुल्क रद्द करा बांगलादेशात आणि जागतिक पातळीवर कापसाची टंचाई असल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कापडाचा उत्पादन खर्च वाढत आहे. मात्र वाढलेल्या दरात खरेदी होत नाही. परिणामी उद्योग अडचणीत येत आहेत. त्यामुळे बांगलादेश सरकारने या संकटाच्या काळात उद्योगांना दिलासा देण्यासाठी एक किंवा दोन वर्षे सर्व प्रकराच्या सुताच्या आयातीवरील शुल्क रद्द करावे. सध्या सूत आयातीवर बांगलादेशात ३७ टक्के नियामक शुल्क आहे.  त्यामुळे स्थानिक पातळीवरील कापडाची मागणी पूर्ण करण्यासाठी सूत आयातीवरील हे शुल्क रद्द करावे, अशी मागणी बांगलादेश टॉवेल आणि लिनन मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष शहदात होसेन यांनी केली.

आंतरराष्ट्रीय कापूस इंडेक्स २८ सप्टेंबर रोजी दशकातील विक्रमी पातळीवर होता आणि सध्याही याच्या आसपास आहे. सध्या कापूस उत्पादक देशांत कापूस वेचणी सुरू झाली आहे. या काळात कापसाचे दर कमी होण्याची अपेक्षा असते. परंतु सध्या वस्तुस्थिती वेगळी आहे. त्यामुळे भविष्यात कापसाचे दर आणि उपलब्धता काय राहील,  याबाबत अनिश्‍चितता आहे. मात्र देशातील कापड उद्योगांकडून अद्यापही प्रतिसाद मिळत नाही. - मूहम्मद अयुब, अध्यक्ष, बांगलादेश कॉटन असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com