Agriculture news in Marathi Concerns raised by rains during urad harvest | Agrowon

उडीद पीक काढणीप्रसंगी पावसाने वाढवली चिंता

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

पाथरूडसह परिसरात शुक्रवारी (ता. ११) रात्री सातच्या सुमारास एक तास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सलग तीन दिवस पाऊस होत असल्याने हातातोंडाशी आलेले खरीप हंगामातील काढणीस आलेल्या उडीद पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

पाथरुड, जि. उस्मानाबाद : पूर्वा नक्षत्राच्या शेवटच्या दोन दिवसामध्ये पाथरूडसह परिसरात शुक्रवारी (ता. ११) रात्री सातच्या सुमारास एक तास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सलग तीन दिवस पाऊस होत असल्याने हातातोंडाशी आलेले खरीप हंगामातील काढणीस आलेल्या उडीद पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच उडिदाचे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याची तारांबळ दिसून येत आहे.

पूर्वा नक्षत्राच्या सुरुवातीपासून आठ ते दहा दिवस पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील  उडीद पिकाची काढणी व मळणीची कामे शेतशिवारात जोमाने चालू होती. परंतु, बुधवार (ता. ९) पासून सलग तीन दिवस संध्याकाळी पाऊस पडत असल्याने शेतशिवारात पावसाचे पाणी साचले असल्याने उडीद मळणीची कामे खोळंबली आहेत.

उडीद मळणीसाठी मळणीयंत्र मिळत नसल्याने काढलेले उडिदाचे पीक शेताच्या बाहेर काढणे व प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होऊ लागली आहे. तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील सुकू लागलेल्या सोयाबीन, तूर, कापूस पिकांसह रब्बी हंगामातील पिकांनाही फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. परंतु, पूर्वा नक्षत्राच्या शेवटी बुधवार ते शुक्रवार असे तीन सलग  दिवस पाऊस झाला आहे.

 पाथरूड परिसरातील पाटसांगवी, राळेसांगवी, हिवर्डा, जयवंतनगर, बेदरवाडी येथील  खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, कापूस मका, सूर्यफूल सर्वच पिकांना चांगली फायदा झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील उडीद पिकांची काढणीची कामे जोरात चालू असल्याने काढलेली उडीद शेतातच पावसात भिजत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

पाथरुड, बागलवाडी, वडाचीवाडी, उमाचीवाडी, दुधोडी, सावरगांव, बेदरवाडी, पाटसांगवी, राळेसांगवी, जयवंतनगर परिसरात मोठा एक तास पाऊस झाला आहे. परंतु उडीद मळणीसाठी मळणी यंत्र मिळत नसल्याने शेतकरी काढलेले उडीदाचे पीक गोळा करुन झाकण्यासाठी शेतकऱ्याची तारांबळ होत आहे.


इतर ताज्या घडामोडी
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...