agriculture news in marathi, Condition favorable for rain in Vidharbha region | Agrowon

विदर्भात पावसासाठी आज पोषक वातावरण

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाले आहे. यामुळे विदर्भातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावणात तयार होत आहे. आज (शुक्रवारी) आणि उद्या (शनिवारी) विदर्भातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी आणि सोमवारी कोकण व विदर्भात मुसळधार पाऊस पडल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला.

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाले आहे. यामुळे विदर्भातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावणात तयार होत आहे. आज (शुक्रवारी) आणि उद्या (शनिवारी) विदर्भातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी आणि सोमवारी कोकण व विदर्भात मुसळधार पाऊस पडल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे उकाड्यात वाढ झाली असून अनेक ठिकाणी उन्हाचा कडाका वाढला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. राज्यातील पुणे, जळगाव, सोलापूर, मुंबई, अलिबाग, डहाणू, औरंगाबाद, परभणी, नांदेड, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशीम, वर्धा येथील कमाल तापमान ३० अंशाच्या वर गेले आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यतच्या चोवीस तासात परभणी येथे राज्यातील सर्वाधिक ३४ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली.

कोकणात काही भागात अंशतहा हवामान ढगाळ आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. कोकणातील म्हापसा, पेडणे, सावंतवाडी, वैभववाडी, काणकोन, चिपळून, कणकवली, मालवण, वेंगुर्ला येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. घाटमाथ्यावरील अंबोणे, शिरगाव, ताम्हिणी, कोयना (पोफळी) येथे अधूनमधून पाऊस पडत होता. मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा, पारोळा, चांदगड, जावळीमेधा, राधानगरी, सिंदखेडा, मराठवाड्यातील माजलगाव, विदर्भातील देऊळगाव राजा येथेही पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

गुरूवारी (ता.२९) सकाळी आठ वाजेपर्यत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत हवामान विभाग)

  • कोकण ः म्हापसा, पेडणे, सावंतवाडी, वैभववाडी ३०, काणकोन, चिपळून, कणकवली, मालवण, वेंगुर्ला २०, हर्णे, लांजा, माणगाव, मडगाव, राजापूर, रत्नागिरी, ऊरण, विक्रमगड १०
  • मध्य महाराष्ट्र ः गगनबावडा, पारोळा २०, चांदगड, जावळीमेधा, राधानगरी, सिंदखेडा १०,
  • मराठवाडा ः माजलगाव २०,
  • विदर्भ ः देऊळगाव राजा १०
  • घाटमाथा ः अंबोणे २०, शिरगाव, ताम्हिणी, कोयना (पोफळी) १० 

इतर अॅग्रो विशेष
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
`सक्ती’चे होईल स्वागतयुरिया विकत घेताना सोबत जैविक (जीवाणू) खते...
देशाला स्वातंत्र्य मिळाले पण...शेतमालाचेच भाव का कोसळतात? कांदा, टोमॅटो ...
नवी बाजार व्यवस्था नवी आव्हानेसध्यातरी बाजार समितीचा कर नाही म्हणून व्यापारी...
आकडे, आरोग्य अन् आयातखाद्यतेलावरील आयातशुल्कात वाढ करून आयातीवर...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...