खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट

जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट बनली आहे. रोपवाटिकांमध्ये सिंचन करावे लागत असून, अतिजोरदार पाऊस व अतिउष्णता, यामुळे उगवणशक्तीवरही परिणाम झाला आहे.
The condition of onion nurseries in Khandesh is critical
The condition of onion nurseries in Khandesh is critical

जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट बनली आहे. रोपवाटिकांमध्ये सिंचन करावे लागत असून, अतिजोरदार पाऊस व अतिउष्णता, यामुळे उगवणशक्तीवरही परिणाम झाला आहे.

कांद्याची लागवड खानदेशात कमी होण्याची शक्यता आहे. कारण, कांद्याला अजूनही हवे तसे दर नाहीत. कांदा रोपे, बियाणे महाग आहेत. लागवडीचा खर्च वाढला आहे. अशा स्थितीत लागवड होणार नाही, असे सांगितले जात आहे. 

अनेक शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात कांदा रोपवाटिका तयार करण्यासाठी बियाण्याची पेरणी केली. त्यावर अनेक भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस आला. यामुळे रोपवाटिकांचे नुकसान झाले. बियाणे व्यवस्थित उगवले नाही. बियाणे यंदा १२०० ते २५०० रुपये प्रतिकिलो, या दरात मिळत होते. यामुळे मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला. 

रोपवाटिकांमध्ये रोपांची वाढही हवी तशी नाही. काळ्या कसदार जमिनीत रोपांची स्थिती बरी आहे. परंतु, रोपे विरळ आहेत. यामुळे शेतकऱ्यांना लागवड कमी करावी लागेल. काही भागात रोपवाटिकांमध्ये रोपे तयार झाली आहेत. परंतु, यंदा रोपवाटिका हव्या तशा नसल्याने रोपांचे दर अधिक आहेत. १५० फूट लांब व तीन फूट रुंद आकाराच्या सरीतील कांदा रोपांचे दर सात ते आठ हजार रुपयांपर्यंत आहेत. 

जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, पाचोरा, धुळ्यातील धुळे, साक्री या भागात कांदा रोपवाटिका आहेत. सध्या अतिउष्णता आहे. सकाळपासून ऊन तापते. यामुळे रोपवाटिकांचे हलक्या जमिनीत रोज सिंचन करावे लागते. यात कमकुवत रोपे होरपळत आहेत. यामुळे नुकसान होत असून, एकरी आठ ते १० किलो बियाण्याच्या रोपवाटिका तयार करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कांदा लागवड अजून सुरू झालेली नाही. परंतु, ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरमध्ये लागवड सुरू होईल. त्यापूर्वी चांगली रोपे तयार करण्याची धडपड शेतकरी करीत असल्याचे चित्र आहे.

दरवर्षी चार ते पाच एकरात कांद्याची लागवड करतो. त्यासाठी रोपवाटिका तयार करतो. परंतु, यंदा रोपे विरळ आहेत. अनेक रोपे होरपळली आहेत. यामुळे नुकसान झाले आहे. - दीपक पाटील, शेतकरी, माचला, ता.चोपडा  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com