मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंघावत आहे. या वादळी प्रणालीमुळे मॉन्सूनचे प्रवाह सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे.
Hawaman
Hawaman

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंघावत आहे. या वादळी प्रणालीमुळे मॉन्सूनचे प्रवाह सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे. हे चक्रीवादळ ओमानकडे सरकणार असल्याने महाराष्ट्रासह पश्‍चिम किनारपट्टीला धोका नसला तरी याचा काहीसा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे. पुढील काळात तुरळक पूर्वमोसमी पावसासह उन्हाचा चटकादेखील वाढणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच वातावरणात अनेक बदल होत आहेत. सोमवारी (ता. १९) सकाळी चोवीस तासांत खानदेशातील जळगाव येथे सर्वाधिक ४२.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही वाढ होत आहे. मात्र ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे, अशा ठिकाणी हवेत गारवा तयार होऊन किमान तापमानात घट होत आहे.  विषुववृत्तीय हिंद महासागरामध्ये आणि लगतच्या दक्षिण अरबी समुद्रामध्ये समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे शुक्रवारपर्यंत (ता. १४) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होणार आहे. या प्रणालीची तीव्रता वाढून अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. हे चक्रीवादळ ओमानकडे सरकत जाताना आणखी तीव्र होईल. या वादळामुळे महाराष्ट्रासह, गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीला फारसा फटका बसणार नसला, तरी अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, सध्या मॉन्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती निर्माण होऊ लागली आहे. विषुववृत्ताकडून वाऱ्यांचे प्रवाह येण्यास सुरुवात झाली आहे. या वादळी प्रणालीमुळे मॉन्सूनचे हे प्रवाह आणखी बळकट होण्यास मदत मिळणार आहे. अंदमान निकोबार बेटांवरही मॉन्सून दाखल झाल्याची वर्दी लवकरच मिळणार आहे. या भागात साधारणतः १८ ते २० मेपर्यंत मॉन्सून दाखल होतो.  राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस  मंगळवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ  बुधवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर  गुरुवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया  शुक्रवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ  सोमवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रूझ) ३४.६ 
  • अलिबाग ३५.९ 
  • रत्नागिरी ३४.६ 
  • डहाणू ३४.५ 
  • पुणे ३७.३ 
  • जळगाव ४२.४ 
  • कोल्हापूर ३४.२ 
  • महाबळेश्‍वर २९.९ 
  • मालेगाव ३९.६ 
  • नाशिक ३७.५ 
  • सांगली ३६.७ 
  • सातारा ३६.६ 
  • सोलापूर ३९.२ 
  • औरंगाबाद ३९.१ 
  • परभणी ३६.५ 
  • उस्मानाबाद ३७.१ 
  • अकोला ४१.१ 
  • अमरावती ३७.६ 
  • बुलडाणा ३९.८ 
  • ब्रह्मपुरी ३९.१ 
  • चंद्रपूर ३९.६ 
  • गोंदिया ३८ 
  • नागपूर ३७.९ 
  • वर्धा ३८.२ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com