agriculture news in Marathi conditions feverable for monsoon Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 मे 2021

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंघावत आहे. या वादळी प्रणालीमुळे मॉन्सूनचे प्रवाह सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे.

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंघावत आहे. या वादळी प्रणालीमुळे मॉन्सूनचे प्रवाह सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे. हे चक्रीवादळ ओमानकडे सरकणार असल्याने महाराष्ट्रासह पश्‍चिम किनारपट्टीला धोका नसला तरी याचा काहीसा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे. पुढील काळात तुरळक पूर्वमोसमी पावसासह उन्हाचा चटकादेखील वाढणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच वातावरणात अनेक बदल होत आहेत. सोमवारी (ता. १९) सकाळी चोवीस तासांत खानदेशातील जळगाव येथे सर्वाधिक ४२.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही वाढ होत आहे. मात्र ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे, अशा ठिकाणी हवेत गारवा तयार होऊन किमान तापमानात घट होत आहे. 

विषुववृत्तीय हिंद महासागरामध्ये आणि लगतच्या दक्षिण अरबी समुद्रामध्ये समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे शुक्रवारपर्यंत (ता. १४) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होणार आहे. या प्रणालीची तीव्रता वाढून अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. हे चक्रीवादळ ओमानकडे सरकत जाताना आणखी तीव्र होईल. या वादळामुळे महाराष्ट्रासह, गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीला फारसा फटका बसणार नसला, तरी अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, सध्या मॉन्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती निर्माण होऊ लागली आहे. विषुववृत्ताकडून वाऱ्यांचे प्रवाह येण्यास सुरुवात झाली आहे. या वादळी प्रणालीमुळे मॉन्सूनचे हे प्रवाह आणखी बळकट होण्यास मदत मिळणार आहे. अंदमान निकोबार बेटांवरही मॉन्सून दाखल झाल्याची वर्दी लवकरच मिळणार आहे. या भागात साधारणतः १८ ते २० मेपर्यंत मॉन्सून दाखल होतो. 

राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस 
मंगळवार ः
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ 
बुधवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर 
गुरुवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया 
शुक्रवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ 

सोमवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रूझ) ३४.६ 
  • अलिबाग ३५.९ 
  • रत्नागिरी ३४.६ 
  • डहाणू ३४.५ 
  • पुणे ३७.३ 
  • जळगाव ४२.४ 
  • कोल्हापूर ३४.२ 
  • महाबळेश्‍वर २९.९ 
  • मालेगाव ३९.६ 
  • नाशिक ३७.५ 
  • सांगली ३६.७ 
  • सातारा ३६.६ 
  • सोलापूर ३९.२ 
  • औरंगाबाद ३९.१ 
  • परभणी ३६.५ 
  • उस्मानाबाद ३७.१ 
  • अकोला ४१.१ 
  • अमरावती ३७.६ 
  • बुलडाणा ३९.८ 
  • ब्रह्मपुरी ३९.१ 
  • चंद्रपूर ३९.६ 
  • गोंदिया ३८ 
  • नागपूर ३७.९ 
  • वर्धा ३८.२ 

इतर अॅग्रो विशेष
कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत मॉन्सून...
राज्यात ठिकठिकाणी धुव्वांधार पुणे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
धरणक्षेत्रांत पावसाचा जोर पुणे : तीन दिवसांपासून कोकणसह, सह्याद्रीच्या...
सरळ कापूस वाण बियाण्यांचा खानदेशात...जळगाव : खानदेशात केळी पट्ट्यात सरळ वाणांची...
मॉन्सूनची वाटचाल सुरूच पुणे : उत्तर भारतात मॉन्सून दाखल झाल्यानंतर...
कृषी सचिव एकनाथ डवले रमले शिवारात नांदेड : राज्याचे कृषी सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे...
विद्यापीठाच्या कांदा बियाणे विक्रीत ‘...नाशिक/नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बियाणे...
कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांना पूरक...पुणे ः सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या...
कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार...
दूध उत्पादकांना रोज १४ कोटींचा फटका नगर ः लॉककाडउनमुळे दुधाची मागणी घटल्याचे सांगत...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
डिजिटल सात-बारासाठी ५१ बँकांनी केले...पुणे : शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल...
कांदा बीजोत्पादनात कंपन्याच मालामाल जळगाव : खानदेशात अनेक कांदा बियाणे निर्मात्या...
‘डीएससी’अभावी हजारो कोटी पडून पुणे ः पंधराव्या वित्त आयोगाचा पाच हजार कोटी...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
विदर्भात पावसाचा जोर पुणे : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील...
लिंबे तोडणीलाही महाग अकोला ः कोरोनामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठा फटका...
मॉन्सून जोमात, पीककर्ज कोमात पुणे ः दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना...