agriculture news in Marathi conditions feverable for monsoon Maharashtra | Page 4 ||| Agrowon

मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 मे 2021

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंघावत आहे. या वादळी प्रणालीमुळे मॉन्सूनचे प्रवाह सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे.

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंघावत आहे. या वादळी प्रणालीमुळे मॉन्सूनचे प्रवाह सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे. हे चक्रीवादळ ओमानकडे सरकणार असल्याने महाराष्ट्रासह पश्‍चिम किनारपट्टीला धोका नसला तरी याचा काहीसा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे. पुढील काळात तुरळक पूर्वमोसमी पावसासह उन्हाचा चटकादेखील वाढणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच वातावरणात अनेक बदल होत आहेत. सोमवारी (ता. १९) सकाळी चोवीस तासांत खानदेशातील जळगाव येथे सर्वाधिक ४२.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही वाढ होत आहे. मात्र ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे, अशा ठिकाणी हवेत गारवा तयार होऊन किमान तापमानात घट होत आहे. 

विषुववृत्तीय हिंद महासागरामध्ये आणि लगतच्या दक्षिण अरबी समुद्रामध्ये समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे शुक्रवारपर्यंत (ता. १४) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होणार आहे. या प्रणालीची तीव्रता वाढून अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. हे चक्रीवादळ ओमानकडे सरकत जाताना आणखी तीव्र होईल. या वादळामुळे महाराष्ट्रासह, गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीला फारसा फटका बसणार नसला, तरी अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, सध्या मॉन्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती निर्माण होऊ लागली आहे. विषुववृत्ताकडून वाऱ्यांचे प्रवाह येण्यास सुरुवात झाली आहे. या वादळी प्रणालीमुळे मॉन्सूनचे हे प्रवाह आणखी बळकट होण्यास मदत मिळणार आहे. अंदमान निकोबार बेटांवरही मॉन्सून दाखल झाल्याची वर्दी लवकरच मिळणार आहे. या भागात साधारणतः १८ ते २० मेपर्यंत मॉन्सून दाखल होतो. 

राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस 
मंगळवार ः
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ 
बुधवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर 
गुरुवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया 
शुक्रवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ 

सोमवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रूझ) ३४.६ 
  • अलिबाग ३५.९ 
  • रत्नागिरी ३४.६ 
  • डहाणू ३४.५ 
  • पुणे ३७.३ 
  • जळगाव ४२.४ 
  • कोल्हापूर ३४.२ 
  • महाबळेश्‍वर २९.९ 
  • मालेगाव ३९.६ 
  • नाशिक ३७.५ 
  • सांगली ३६.७ 
  • सातारा ३६.६ 
  • सोलापूर ३९.२ 
  • औरंगाबाद ३९.१ 
  • परभणी ३६.५ 
  • उस्मानाबाद ३७.१ 
  • अकोला ४१.१ 
  • अमरावती ३७.६ 
  • बुलडाणा ३९.८ 
  • ब्रह्मपुरी ३९.१ 
  • चंद्रपूर ३९.६ 
  • गोंदिया ३८ 
  • नागपूर ३७.९ 
  • वर्धा ३८.२ 

इतर बातम्या
विमा कंपन्यांवर पूर्वसूचनांचा पाऊस !...पुणे : राज्याच्या विविध भागांत झालेल्या...
लाळ्या खुरकूत लसींची प्रतीक्षाच;...पुणे ः पावसाळा संपत आला तरी अद्याप राज्यातील दोन...
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...
मॉन्सूनच्या परतीचा मुहूर्त लांबणारपुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून)...
राज्यात पावसाच्या उघडिपीची शक्यतापुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून...पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण...
केंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७...कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत,...
मराठवाड्यात आतापर्यंत अपेक्षेपेक्षा...औरंगाबाद : मराठवाड्यात जून ते सप्टेबरपर्यंत...
निफाड तालुक्यातील ब्रिटिशकालीन नाले, चर...निफाड, जि. नाशिक : ब्रिटिशकालीन नाले, चर नामशेष...
अकोल्यातील प्रकल्प सलग तिसऱ्या वर्षी...अकोलाः गेल्या दोन-तीन वर्षांपासून जिल्‍ह्यातील...
पुणे जिल्ह्यात धरणांतील विसर्गात घटपुणे : पावसाचा जोर ओसरला असला, तरी धरणात पाण्याची...
सांगलीतील १४४ सहकारी संस्थांच्या...सांगली ः जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका...
नुकसान भरपाईपासून वंचित मच्छीमारांसाठी...सिंधुदुर्गनगरी ः नुकसान भरपाईपासून वंचित...
अमरावती जिल्ह्यातील शेतकरी ई-पीक...अमरावती : राज्य सरकारने सुरू केलेल्या ई-पीक...
नगर जिल्ह्यातील पाण्याचे ५६ नमुने दूषितनगर ः जिल्ह्यातील चौदा तालुक्‍यांतील ऑगस्ट...
राज्यात हलक्या पावसाची शक्यता पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. आज (ता. १६...
सोयाबीनचा उच्चांकी दर मिळतोय अत्यल्प...अकोला ः सध्या बाजारात सोयाबीनला कुठे दहा हजार,...