Conduct comprehensive panchnama of damaged crops
Conduct comprehensive panchnama of damaged crops

`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करा`

औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या भागात किती पिकाचे नुकसान झाले. केवळ नदी व ओढ्याकाठच्या नुकसानीची पाहणी न करता सरसकट पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी.

औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या भागात किती पिकाचे नुकसान झाले. केवळ नदी व ओढ्याकाठच्या नुकसानीची पाहणी न करता सरसकट पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

कायगाव ता गंगापूर परिसरातील अमळनेर, कायगाव, अगरवाडगाव- धनगरपट्टी या परिसरात वेचणी आलेल्या कपाशीची वाती होऊन मोड फुटले आहेत. तर, ५० टक्केच्या पूढे कपाशीची बोंडे काळी पडली आहेत. फुल, पाते गळून कापूस फरदड झाल्याचे चित्र आहे. गुरुवारी (ता.१७) सप्टेंबर रात्रीपासून सुरू झालेल्या उत्तरा नक्षत्राच्या दमदार पावसाने भेंडाळा (ता.गंगापूर) येथील महसूल मंडळातील ३,८४७ हेक्टर कापूस, ८५६ हेक्टर सोयाबीन, २९ हेकटर भुईमूग, २,४७५ हेक्टर ऊस,५१ हेक्टर मूग, ५३४ हेक्टर तूर, ८६८ हेक्टर मका, ४६० हेकटर बाजरीची पिके अतिवृष्टीच्या पावसाने धोक्यात आली आहेत. 

गोदकाठच्या नेवरगाव, ममदापूर, बगडी, जामगाव, अगरकानडगाव, कायगाव, अमळनेर, लखमापूर, गणेशवाडी, गलनिंब, भिवधानोरा, धनगरपट्टी, सोलेगाव, ढोरेगाव, पुरी, भेंडाळा, पेंडापूर, ढोरेगाव आदी गावे, शिवारातील शेती पिकांची दाणादाण केली आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन, मूग, भुईमूग, बाजरी, मका, तूर, ऊस आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

अंबड तालुक्यात डावरगाव, पावसेपांगरी, कवडगाव, बनटाकऴी, कासारवाडी, रामनगर, नारायणगावसह आदी ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. 

पाऊस, वादळाने अनेक ठिकाणी कपाशी, बाजरी, मका, ऊस पिके आडवी झाली. त्यातच शेतात पाणी साचल्यानं मोठं नुकसान झालं. त्यामुळे केवळ ओढा किंवा नदीकाठच्या नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. - सिद्धेश्ववर जंगले, शेतकरी बानेगाव, जि. जालना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com