अकोले तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करा

नगर : भात, सोयाबीन, वरई, कांदापिकाचे अवकाळी पाऊस व किडीने मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आदिवासी शेतकऱ्यांनी दिला.
Conduct comprehensive panchnama of damaged crops in Akole taluka
Conduct comprehensive panchnama of damaged crops in Akole taluka

पुणे नगर : भात, सोयाबीन, वरई, कांदापिकाचे अवकाळी पाऊस व किडीने मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आदिवासी शेतकऱ्यांनी दिला. 

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गेल्या काही दिवसांत सातत्याने पाऊस होत आहे. दोन दिवसांपूर्वी पुन्हा जोरदार पाऊस झाला. घाटघर येथे अतिवृष्टीची नोंद झाली. या शिवाय भंडारदरा, रतनवाडी, पांजरे, वाकी आदी भागांतही जोरदार पाऊस झाला. या पावसाचा भातशेतीला फटका बसत आहे. अनेक ठिकाणी भाताचे पीक भुईसपाट झाले आहे.

सोंगणीला आलेल्या भाताचेही नुकसान झाले आहे. त्याचा आर्थिक फटका आदिवासी शेतकऱ्यांना बसणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आदिवासी विकास परिषद (पेसा), सरपंच परिषद, भाजपच्या वतीने करण्यात आली. मागण्यांसाठी आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी वारंघुशी फाट्यावर शनिवारी (ता. २०) रास्ता रोको आंदोलन केले. 

शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. मागील दोन महिन्यांपासून आम्ही तालुका कृषी अधिकारी, महसूल विभागास निवेदन दिले. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी पंचनामे केले नाहीत. थकीत वीजबिल भरले नाही म्हणून जोड तोडले. विम्याची भरपाई नाही, धान खरेदी केंद्र अद्याप बंद आहे. आमची कुणी दखल घेत नसल्याने आंदोलन केले. मागण्यांची दखल न घेतल्यास या पेक्षा मोठे आंदोलन करू, असा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला. 

धान खरेदी केंद्र सुरू करा 

राज्यातील महाविकास आघाडी सरकार गरिबांचे नाही. ते अफू, गांजा विकणाऱ्यांचे आहे. त्यांनी आदिवासी शेतकऱ्यांना गांजा पीकविम्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करत, धानखरेदी केंद्र तत्काळ सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com