Agriculture news in marathi `Conduct crop damage panchnama in Amravati district` | Agrowon

`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे करा`

टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकाचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत देण्यात आले. 

अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकाचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत देण्यात आले. 

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. यावेळी अध्यक्ष बबलू देशमुख, सभापती दयाराम काळे, प्रियंका दगडकर, पूजा आमले, पार्वती काठोळे, वासंती मंगरोळे,  सुशीला कुकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता शारीष तट्टे,  पाणीपुरवठा विभागाचे राजेंद्र सावळकर, चंद्रशेखर खंडारे, श्रीराम कुलकर्णी, कृषी विभागाचे अनिल खर्चान उपस्थित होते. 

सततच्या पावसामुळे काही ठिकाणी कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश अध्यक्षांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाभरात ‘मागेल त्याला शेततळे’ याबाबत विस्तृत अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.  

अमरावती तालुक्यातील सात, अचलपूर तालुक्यातील १८ गावांना पाण्यासाठी विहीर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सभागृहात दिली. सिंचन विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कामांचा विस्तृत आढावा घेण्यात आला. पथ्रोट येथे पाणीपुरवठा संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मुद्दा मांडण्यात आला.
 


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांनी केळी पीकविमा भरू नयेजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
सांगलीत रब्बीचा ३९ हजार हेक्टरवर पेरासांगली ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी...
मराठवाड्यात नुकसान भरपाईसाठी १७३४...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यातील पिकांच्या नुकसान...
रत्नागिरीतील पीक नुकसानीची भरपाई मिळेल...चिपळूण, जि. रत्नागिरी ः चिपळूण तालुक्यात मागील...
शितादही करण्यापुरताही कापूस लागला नाहीअकोला ः शेतकऱ्याने कपाशीची लागवड केली. कपाशीची...
परभणी जिल्ह्यात पीकविमा परताव्यासाठी ३१...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...
सीताफळ प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन...अकोला ः गेल्या काही वर्षात सीताफळ लागवडीकडे...
नगरमधील ६० गावांतील ७८ पाणी नमुने दूषितनगर ः जिल्ह्यातील १४ तालुक्‍यांतील सप्टेंबर...
पुणे कृषी महाविद्यालयात आंदोलनपुणे ः सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी महात्मा...
गोंदिया जिल्ह्यातील दोन संस्थांचा धान...गोंदिया : नियमबाह्यरीत्या धान खरेदी तसेच...
हिंगोली जिल्ह्यात तीन लाख ७ हजार...हिंगोली : जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीमुळे...
उत्पादन खर्चाच्या दुप्पट दराचे काय? ः...नाशिक : ‘‘केंद्र सरकारने कांदा...
सोलापूर जिल्ह्यात पावणे दोन लाख हेक्‍टर...सोलापूर : अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात...
सोलापुरात महावितरण मुख्यालयाला ‘...सोलापूर : लॉकडाऊन काळातील शेतीचे संपूर्ण वीज बिल...
सोलापूर जिल्ह्यात तीस हजार शेतीपंपाच्या...सोलापूर :  अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे...
सेंद्रीय आणि शाश्‍वत शेती विकासासाठी ‘...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...
कांदाप्रश्नी केंद्राकडे पाठपुरावा करू:...नाशिक: कांदा साठवणूक मर्यादा निर्णयाच्या संदर्भात...
डाळिंबातील बुरशीजन्य मर रोगाचे...फळ तोडणीनंतर ताणावर असताना किंवा पिकाच्या...
केळी पिकावरील मर रोगाचे व्यवस्थापनझाडावरील जुन्या पानांच्या देठाकडील तळभागी फिकट...
सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्यसूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात मातीतून आणि...