पदवीधरची निवडणूक प्रक्रिया सतर्कतेने पार पाडा : सिंह

औरंगाबाद : ‘‘पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत आचारसंहितेचे पालन करा. सर्व उपाययोजना सज्ज ठेऊन निवडणूक प्रक्रिया पार पाडावी’’, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिले.
Conduct graduate election process carefully: Singh
Conduct graduate election process carefully: Singh

औरंगाबाद : ‘‘पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत आचारसंहितेचे पालन करा. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सतर्कतेने सर्व उपाययोजना सज्ज ठेऊन निवडणूक प्रक्रिया पार पाडावी’’, असे निर्देश प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिले.

औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी (ता.२६) औरंगाबाद विभागातील निवडणूक विषयक पूर्व तयारीचा आढावा सिंह यांनी घेतला. सह-मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. प्रसन्ना, जिल्हाधिकारी उपस्थित होते.

सिंह म्हणाले, ‘‘सर्व मतदान केंद्रांवर पुरेशा प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाययोजना, आरोग्य पथक सज्ज ठेवावे, गर्दीस प्रतिबंध आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे. सर्व मतदारांना सॅनिटायजर देऊन मगच मतदान केंद्रात प्रवेश द्या. मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करा. मतदान, मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार, नियमबाह्य गोष्टी घडणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी. अशा प्रकारच्या घटनेची तातडीने आयोगास माहिती द्यावी. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी घडणार नाही, यासाठी खबरदारी घ्यावी.’’ 

केंद्रेकर म्हणाले, ‘‘विभागात एकूण ३ लाख ७३ हजार १६६ पदवीधर मतदार आहेत. त्यात पुरूष पदवीधर मतदार २ लाख ८६ हजार २४९, तर महिला पदवीधर ८६ हजार ९०९ आहे. तर, सर्वाधिक एकुण पदवीधर मतदार संख्या ही औरंगाबाद जिल्ह्याची १ लाख ६३ हजार ७९, जालना-२९ हजार ७६५, परभणी- ३२ हजार ७१५, हिंगोली-१६ हजार ७९४, नांदेड-४९ हजार २८५, बीड- ६३ हजार ४३६, लातूर- ४१ हजार १९०, उस्मानाबाद - ३३ हजार ६३२ इतकी आहे.’’ 

‘‘औरंगाबाद विभागात एकूण ८१३ मतदान केंद्रे आहेत. त्यात औरंगाबाद-२०६, जालना-७४, परभणी-७८, हिंगोली-३९, नांदेड-१२३, लातूर-८८, उस्मानाबाद-७४, बीड-१३१ मतदान केंद्र आहेत. विभागात एकूण ९३७ सुक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे,’’ असेही केंद्रेकर म्हणाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com