राज्य द्राक्ष बागायतदार संघाची चर्चासत्रे होणार ऑनलाइन

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने दरवर्षी वार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात येते.
grapes
grapes

नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने दरवर्षी वार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनातील चर्चासत्रे ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत, अशी माहिती माहिती द्राक्ष बागायतदार संघाचे कोषाध्यक्ष कैलास भोसले यांनी दिली. द्राक्ष बागायतदार संघाचे अधिवेशन २१ ते २६ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय जिरायती क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक दलवाई, कृषी आयुक्त धीरज कुमार मार्गदर्शन करणार आहेत. तांत्रिक मार्गदर्शन राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक व शास्त्रज्ञ करणार आहेत. यासह राज्यातील व परदेशातील द्राक्ष तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. मराठी अनुवादक काही इंग्रजीतून होणाऱ्या चर्चासत्राचे अनुवाद करणार आहेत.  हा कार्यक्रम cisco webex व फेसबुक पेजवरून सादर केला जाणार आहे. द्राक्ष बागायतदारांनी वार्षिक सेमिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, उपाध्यक्ष शिवाजी पवार, खजिनदार कैलास भोसले व मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष अरविंद कांचन यांनी  केले आहे.  हे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.डी. सावंत, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ.आर.जी. सोमकुंवर, यासह शास्त्रज्ञ डॉ.ए.के. उपाध्याय, डॉ.एस.डी. रामटेके, डॉ. ए.के. शर्मा, डॉ. डी.एस. यादव, डॉ. सुजॉय सहा, डॉ. के. बॅनर्जी, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या संशोधन सल्लागार समितीचे सदस्य डॉ. जयराम खिलारी, डॉ. डॉग्लास एच. मेरिन(नेदरलँड), डॉ. एस.डी. शिखामानी, पीटर डे व्रइस, ''सह्याद्री फार्मर्स''चे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, अंटोनिस अंगलेटकीस(युके), डॉ. दमन वालिया(यूएसए) आदी मार्गदर्शन करणार आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com