agriculture news in Marathi conference of grapes bagayatdar sangh online this year Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्य द्राक्ष बागायतदार संघाची चर्चासत्रे होणार ऑनलाइन

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 सप्टेंबर 2020

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने दरवर्षी वार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात येते.

नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने दरवर्षी वार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनातील चर्चासत्रे ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत, अशी माहिती माहिती द्राक्ष बागायतदार संघाचे कोषाध्यक्ष कैलास भोसले यांनी दिली.

द्राक्ष बागायतदार संघाचे अधिवेशन २१ ते २६ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय जिरायती क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक दलवाई, कृषी आयुक्त धीरज कुमार मार्गदर्शन करणार आहेत. तांत्रिक मार्गदर्शन राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक व शास्त्रज्ञ करणार आहेत. यासह राज्यातील व परदेशातील द्राक्ष तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. मराठी अनुवादक काही इंग्रजीतून होणाऱ्या चर्चासत्राचे अनुवाद करणार आहेत. 

हा कार्यक्रम cisco webex व फेसबुक पेजवरून सादर केला जाणार आहे. द्राक्ष बागायतदारांनी वार्षिक सेमिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, उपाध्यक्ष शिवाजी पवार, खजिनदार कैलास भोसले व मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष अरविंद कांचन यांनी 
केले आहे. 

हे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.डी. सावंत, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ.आर.जी. सोमकुंवर, यासह शास्त्रज्ञ डॉ.ए.के. उपाध्याय, डॉ.एस.डी. रामटेके, डॉ. ए.के. शर्मा, डॉ. डी.एस. यादव, डॉ. सुजॉय सहा, डॉ. के. बॅनर्जी, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या संशोधन सल्लागार समितीचे सदस्य डॉ. जयराम खिलारी, डॉ. डॉग्लास एच. मेरिन(नेदरलँड), डॉ. एस.डी. शिखामानी, पीटर डे व्रइस, ''सह्याद्री फार्मर्स''चे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, अंटोनिस अंगलेटकीस(युके), डॉ. दमन वालिया(यूएसए) आदी मार्गदर्शन करणार आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
एफआरपी एकरकमी देणार की तुकडे होणार?सातारा : यावर्षीच्या ऊस हंगामासाठी एक ते दोन...
कृषी योजनांच्या अंमलबजावणीत अकोला अव्वलअकोला ः जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविलेल्या...
पीक नुकसानीची मदत निश्‍चित मिळेल ः मलिकपरभणी : ‘‘हवामान विभागाने रविवार (ता.२५)...
रयत क्रांती संघटनेतर्फे जागरण गोंधळ...पुणे ः  रयत क्रांती संघटनेतर्फे...
इथेनॉल पूर्णत्वासाठी ‘कादवा’ला सहकार्य...नाशिक : ‘‘अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पुन्हा मुसळधार...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांची...
नाथाभाऊ काय चीज आहे, दाखवून देऊ : शरद...मुंबई: नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने...
शेतकऱ्यांना मदत करण्याचीच भूमिका : शहालातूर : ‘‘कृषी उत्पन्न बाजार समितीने अडचणीच्या...
धान्य खरेदीसाठी नोंदणीचे निर्देशच नाहीत जळगाव ः जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून शासकीय धान्य...
मदतीच्या घोषणेचे स्वागत, पण तोकडीः डॉ....नगर ः राज्यात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त...
जलसंधारणाच्या `बुलडाणा पॅटर्न`चा डंकाअकोला ः महामार्ग तयार करताना त्यासाठी लागणारे...
सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थसोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
कापूस उत्पादकांचे शोषण थांबवा: विजय...नागपूर: देशात कापसाचे दर कमी होत असतानाच...
फवारणीनंतर १८ एकरातील कपाशीने टाकल्या...अकोला ः जिल्ह्यातील म्हातोडी येथील शेतकऱ्याने...
खडसेंच्या पक्षांतराने बदलणार राजकीय...जळगाव ः भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे...
मक्याची लॉट एंट्री न झाल्याने ‘शोले...सटाणा, जि. नाशिक: हमीभावाने खरेदी केलेल्या...
परभणी जिल्ह्यात महावितरणची ६३७...परभणी :  जिल्ह्यातील वीजचोरीला आळा...
ला निनामुळे मान्सून प्रभावितलॉकडाऊनची परिस्थिती पाहता, महाराष्ट्रात...
तंत्रज्ञान हरभरा लागवडीचे...जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पीक...