राज्यात गोंधळलेले सरकार: देवेेंद्र फडणवीस

Devendra fadnvis
Devendra fadnvis

मुंबई ः दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत नाही, अशी नव्या सरकारची अवस्था आहे. त्यांच्यातच विसंवाद आहे. आतापर्यंतचे हे सर्वात गोंधळलेले सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. २३) केली.  तसेच विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी महाविकास आघाडी सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्ष भाजपने बहिष्कार टाकला आहे. ‘‘सध्याच्या सरकारमधील पक्षांमध्ये आपापसातच सुसंवाद नाही. ते बोलतात एक आणि करतात एक. त्यामुळे त्यांनी आधी आपसात संवाद साधावा; मग आम्हाला चहापानासाठी व सुसंवादासाठी बोलवावे,’’ असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपची पत्रकार परिषद मुंबई येथे पार पडली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले. आतापर्यंतचे हे सर्वात गोंधळलेले सरकार असल्याची टीका फडणवीस यांनी केली. फडणवीस यांनी या वेळी सरकारच्या कारभारावरही जोरदार टीका केली.  ‘‘दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत नाही, अशी नव्या सरकारची अवस्था आहे. त्यांच्यातच विसंवाद आहे. सरकारने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काहीही मदत मिळालेली नाही. ज्या कर्जमाफीला नावे ठेवली, तीच पद्धत त्यांनी अमलात आणली. 

कर्जमाफीमध्ये केवळ पीककर्जाचा समावेश आहे. शेडनेट, पशुपालन अशा कर्जाचा यात समावेश करण्यात आलेला नाही. ही फसवणूक आहे. अशा परिस्थितीत आम्ही सरकारच्या चहापानाला जाऊ शकत नाही,’’ असे फडणवीस म्हणाले. सरकारची लागणार कसोटी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राज्याची आर्थिक स्थिती, अर्थसंकल्प, शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा होईल. तसेच सीएएविरोधातील आंदोलने, एल्गार प्रकरणाचा तपास, कोरेगाव भीमा या मुद्द्यांवर सत्ताधारी तसेच विरोधी दोन्ही बाजूंकडील सदस्य आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हे अधिवेशन चांगलेच गाजणार असल्याची शक्यता आहे. कर्जमाफी नाही आणि मुक्तीही नाही राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तीन पक्ष मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. सरकार स्थापन येऊन तीन महिने झाले आहेत. आतापर्यंत नव्या सरकारला सूर गवसलेला नाही, असा टोला फडणवीसांना ठाकरे सरकारवर लगावला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाकरे सरकारने केलेल्या कर्जमाफीवरदेखील फडणवीस यांनी निशाणा साधला. ‘कर्जमाफी नाही आणि मुक्तीही नाही,’ असे ते म्हणाले. ‘जाहीरनाम्यातील एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही, तसेच कर्जमाफीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू असल्याचा आरोपही त्यांनी राज्य सरकारवर केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com