agriculture news in marathi Confusion about Khandesh pilgrimage this year | Agrowon

खानदेशातील यात्रोत्सवांबाबत यंदा संभ्रम

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

सारंगखेडा, जि. नंदुरबार : सद्य परिस्थितीत खानदेशातील विविध प्रसिद्ध यात्रा भरणार की नाही, याविषयी कोणीही नेमकेपणाने सांगू शकत नसल्याने याबाबत संभ्रम कायम आहे.

सारंगखेडा, जि. नंदुरबार : कार्तिकी एकादशी नंतर यात्रांना सुरवात होते. यात्रा हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या खानदेशातील लाखाहून अधिक व्यावसायिकाच्या अर्थकारणावर यात्रांचा प्रभाव आहे. समाजव्यवस्था टिकवून ठेवणारा महत्त्वाचा घटक आहे. सद्य परिस्थितीत खानदेशातील विविध प्रसिद्ध यात्रा भरणार की नाही, याविषयी कोणीही नेमकेपणाने सांगू शकत नसल्याने याबाबत संभ्रम कायम आहे.

दरवर्षी कार्तिकी नंतर महिन्याभरात खानदेशातील सर्वात मोठी यात्रा सारंगखेडा (ता.शहादा) येथे भरते. यात्रे बरोबर गेल्या पाच वर्षांपासून चेतक फेस्टिव्हल भरविला जातो. याच्या नियोजनासाठी तीन महिने अगोदरच जिल्हास्तरीय बैठक होते.

कोरोनामुळे सारंगखेडा यात्रोत्सवाच्या निमित्ताने कोणतीही बैठक आतापर्यंत झाली नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. येथील यात्रोत्सवाला साडे चारशे वर्षाची परंपरा आहे. येथे देशाच्या कानाकोपऱ्यांतून घोडे खरेदी, विक्रीसाठी अश्वप्रेमी येतात.  

कोरोनामुळे मोठ्या उद्योगांवर संकट आले. हजारो लोक बेरोजगार झाले. त्याच बरोबर छोटया व्यावसायिकांनाही धक्का बसला आहे. या वर्षी यात्रा नाही भरली, तर आगामी वर्षभर आर्थिक व्यवस्था कशी करावयाची, अशा विवंचनेत व्यावसायिक आहेत. कोरोनाचा संसर्ग येत्या काही दिवसांत कमी झाला, तर कार्तिकीनंतर भरणाऱ्या यात्रोत्सवांचा विचार होऊ शकेल. अन्यथा, गर्दीमुळे संसर्ग पुन्हा पसरू नये, यासाठी धोका न पत्करता यात्रोत्सव रद्द होऊ 
शकतो. 

खानदेशात प्रसिद्ध यात्रा 

खानदेशात सारंगखेडासह विखरण, शिरपूर, आमळी, बोरीस, तळोदा, शिंदे, मंदाणे, मुडावद, बहादरपूर, अमळनेर, धुळे, चोरवड, वायपूर आदी ठिकाणच्या यात्रा प्रसिद्ध आहेत. याशिवाय नवरात्र, चैत्र महिन्यात एकवीरादेवी, पेडकाईदेवी, मनुदेवी, बिजासनीदेवी, धनदाईदेवी, इंदाशीदेवी, धनाई पुनाई देवी, आशापुरीदेवी, भटाईदेवी आदी देवींच्या यात्रा ही प्रसिद्ध आहेत.
 


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...