पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी खात्यातच गोंधळ

विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल केलेले प्रस्ताव कृषी विभागाने परत पाठवल्याने खात्यातील गोंधळ समोर आला आहे. विभागीय सहसंचालक कार्यालयाने प्रस्ताव परत करताना जिल्हा कृषी विभागाकडे बोट दाखवले आहे.
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी खात्यातच गोंधळ
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी खात्यातच गोंधळ

अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल केलेले प्रस्ताव कृषी विभागाने परत पाठवल्याने खात्यातील गोंधळ समोर आला आहे. विभागीय सहसंचालक कार्यालयाने प्रस्ताव परत करताना जिल्हा कृषी विभागाकडे बोट दाखवले आहे. प्रस्तावातील त्रुट्या दूर करण्याची सूचना करीत शेतकरी पुरस्कारापासून वंचित राहल्यास विभागीय सहसंचालक कार्यालय जबाबदार राहणार नसल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २०२०-२१ वर्षासाठी दाखल केलेले शेतकरी पुरस्कारासाठीचे प्रस्ताव परत करण्यात आले आहेत. या प्रस्तावामध्ये काही त्रुट्या दाखवण्यात आल्या आहेत. यापैकी एक त्रुटी ही यंदा फेब्रुवारीत आलेल्या नव्या परिपत्रकामुळे तयार झाली आहे. शेतकऱ्यांचे प्रस्ताव मागील वर्षात सादर झाले होते. असे असताना त्यांना २०२१ मध्ये फेब्रुवारी महिन्यात आलेल्या नव्या नियमानुसार प्रपत्र सादर करण्यास सांगितले जात आहे. नेमके याच मुद्यावरून शेतकरी संतप्त झाले आहेत.  विभागीय कार्यालयाकडून नवीन शासन निर्णयानुसार प्रस्ताव देण्याचा आग्रहसुद्धा कशासाठी होत आहे, हाही प्रश्‍न कोड्यात टाकणारा आहे. या प्रकरणात आता विभागीय सहसंचालक कार्यालयाने जिल्हा कृषी विभागाला पत्र देत प्रस्तावातील त्रुटींबाबत आपणास वारंवार कळविल्याचे म्हटले आहे. या त्रुटी दूर करून नव्याने प्रस्ताव दाखल करण्याची सूचनाही केली आहे. त्रुटींअभावी हे शेतकरी पुरस्कारापासून वंचित राहल्यास आपण जबाबदार नसू, असेही या पत्रात म्हटले आहे. नेमका हा गोंधळ का वाढवला जात आहे, याचे उत्तर कोणताही अधिकारी द्यायला  तयार नाही.  नवीन नियम जुन्यासाठी कसा? शासनाचा नवीन नियम जुन्या वर्षासाठी कसा लागू होऊ शकतो, असा साधासरळ प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत. ज्यांचे प्रस्ताव परत आले त्यापैकी काहींनी जिल्हा अधीक्षकांनाही याबाबत नुकतेच लेखी पत्र दिले. प्रपत्र ड आणि ई हे फेब्रुवारी २०२१च्या शासन निर्णयातील आहेत. आपला प्रस्ताव १५ फेब्रुवारी २०२१ पूर्वी पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव २०२० ला असलेल्या शासन नियमानुसार स्विकारून मंजूर करावा, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यातील एका अधिकाऱ्यानेही याबाबत प्रश्‍न केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com