agriculture news in marathi Confusion in the agriculture department over the award proposal | Page 4 ||| Agrowon

पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी खात्यातच गोंधळ

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 सप्टेंबर 2021

विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल केलेले प्रस्ताव कृषी विभागाने परत पाठवल्याने खात्यातील गोंधळ समोर आला आहे. विभागीय सहसंचालक कार्यालयाने प्रस्ताव परत करताना जिल्हा कृषी विभागाकडे बोट दाखवले आहे.

अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल केलेले प्रस्ताव कृषी विभागाने परत पाठवल्याने खात्यातील गोंधळ समोर आला आहे. विभागीय सहसंचालक कार्यालयाने प्रस्ताव परत करताना जिल्हा कृषी विभागाकडे बोट दाखवले आहे. प्रस्तावातील त्रुट्या दूर करण्याची सूचना करीत शेतकरी पुरस्कारापासून वंचित राहल्यास विभागीय सहसंचालक कार्यालय जबाबदार राहणार नसल्याचे म्हटले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २०२०-२१ वर्षासाठी दाखल केलेले शेतकरी पुरस्कारासाठीचे प्रस्ताव परत करण्यात आले आहेत. या प्रस्तावामध्ये काही त्रुट्या दाखवण्यात आल्या आहेत. यापैकी एक त्रुटी ही यंदा फेब्रुवारीत आलेल्या नव्या परिपत्रकामुळे तयार झाली आहे. शेतकऱ्यांचे प्रस्ताव मागील वर्षात सादर झाले होते. असे असताना त्यांना २०२१ मध्ये फेब्रुवारी महिन्यात आलेल्या नव्या नियमानुसार प्रपत्र सादर करण्यास सांगितले जात आहे. नेमके याच मुद्यावरून शेतकरी संतप्त झाले आहेत. 

विभागीय कार्यालयाकडून नवीन शासन निर्णयानुसार प्रस्ताव देण्याचा आग्रहसुद्धा कशासाठी होत आहे, हाही प्रश्‍न कोड्यात टाकणारा आहे. या प्रकरणात आता विभागीय सहसंचालक कार्यालयाने जिल्हा कृषी विभागाला पत्र देत प्रस्तावातील त्रुटींबाबत आपणास वारंवार कळविल्याचे म्हटले आहे. या त्रुटी दूर करून नव्याने प्रस्ताव दाखल करण्याची सूचनाही केली आहे. त्रुटींअभावी हे शेतकरी पुरस्कारापासून वंचित राहल्यास आपण जबाबदार नसू, असेही या पत्रात म्हटले आहे. नेमका हा गोंधळ का वाढवला जात आहे, याचे उत्तर कोणताही अधिकारी द्यायला  तयार नाही.

 नवीन नियम जुन्यासाठी कसा?
शासनाचा नवीन नियम जुन्या वर्षासाठी कसा लागू होऊ शकतो, असा साधासरळ प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत. ज्यांचे प्रस्ताव परत आले त्यापैकी काहींनी जिल्हा अधीक्षकांनाही याबाबत नुकतेच लेखी पत्र दिले. प्रपत्र ड आणि ई हे फेब्रुवारी २०२१च्या शासन निर्णयातील आहेत. आपला प्रस्ताव १५ फेब्रुवारी २०२१ पूर्वी पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव २०२० ला असलेल्या शासन नियमानुसार स्विकारून मंजूर करावा, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यातील एका अधिकाऱ्यानेही याबाबत प्रश्‍न केला आहे.


इतर ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात पीकविमा परतावा आजपासून...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी...
परभणी जिल्ह्यात खतांची मागणी वाढलीपरभणी ः परभणी जिल्ह्यात शनिवार (ता.६) अखेर पर्यंत...
पुणे जिल्ह्यात ढगांमुळे शेतकरी धास्तावलेपुणे ः परतीच्या पावसाने फळबागा व शेतीला मोठा फटका...
नगर जिल्ह्यात साडेपाच हजार शेतकऱ्यांना...नगर ः राज्य सरकारच्या धोरणानुसार महात्मा जोतिराव...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘बळिराजा’च्या...सांगली : ‘एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे’, ‘या...
सरकारने कोंबड्या जगविण्यासाठी शेतकरी...यवतमाळ : केंद्र सरकारने कोंबड्यांना खाद्य...
अंजीर बाग एकदम ‘हेल्दी’ आहे......सोमेश्‍वरनगर, जि. पुणे : ‘एकाही पानावर स्पॉट नाही...
विजेअभावी पिकांना पाणी देण्यास अडचणी नाशिक : अतिवृष्टीमुळे शेतमालाचे नुकसान झाले,...
जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवडीचा खडसेंचा...जळगाव ः जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
केळी पिकासाठी ३६ हजार रुपये परतावा द्या...जळगाव : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा...
बार्शी बाजार समिती सौरऊर्जेवरसोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत ९६...
द्राक्षबागेतील सद्यपरिस्थितीतील रोगांचा...बहुतांश द्राक्ष बागांमध्ये सध्या फळछाटणी पूर्ण...
धनत्रयोदशीला जळगावात ३० किलो सोने विक्रीजळगाव : जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सुवर्ण...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष पट्ट्याला...सांगली : श्रीलंका, तमिळनाडू किनाऱ्यालगतच्या...
नांदेड जिल्ह्यात आचारसंहितेने...नांदेड : जिल्ह्यातील साडेआठ लाख नुकसानग्रस्तांना...
अकोला जिल्ह्याची पैसेवारी ५३ पैसेअकोला : जिल्ह्यात या वर्षी झालेला अनेकदा...
सांगली जिल्हा बँक जागावाटपात महविकास...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या निवडणुकीसाठी...
रत्नागिरी तालुक्यात भाताच्या लोंबीत...रत्नागिरी : फुलोऱ्या‍च्यावेळी पडलेल्या मुसळधार...
देगलूर-बिलोलीची निवडणूक ‘महाविकास’च्या...नांदेड : देगलूर - बिलोली विधानसभा निवडणुकीत...
ऊसबिलातून वीजबिल कपातीच्या आदेशाची...नगर : शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून साखर कारखान्यांनी...