agriculture news in marathi, Confusion in bond Larvae Grant | Agrowon

बोदवडमध्ये बोंड अळीच्या अनुदानात गोंधळ

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 ऑगस्ट 2018

जळगाव  : गुलाबी बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई अनुदान मंजूर केले असून, बोदवड तालुक्‍यात या अनुदानाबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. तलाठ्यांकडील यादीत मंजूर रक्‍कम व जमा झालेल्या रकमेत तफावत आढळून आली आहे. आठ हजार मंजूर झाले असताना शेतकऱ्याच्या खात्यात हजार रुपयेच जमा झाल्याचे आढळून आले असून, शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

जळगाव  : गुलाबी बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई अनुदान मंजूर केले असून, बोदवड तालुक्‍यात या अनुदानाबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. तलाठ्यांकडील यादीत मंजूर रक्‍कम व जमा झालेल्या रकमेत तफावत आढळून आली आहे. आठ हजार मंजूर झाले असताना शेतकऱ्याच्या खात्यात हजार रुपयेच जमा झाल्याचे आढळून आले असून, शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

बोंड अळीचे अनुदान २०१७-१८ च्या नुकसानभरपाईबाबत मंजूर रकमेसंबंधीचा हा प्रकार अाहे. त्यामुळे शेतकरी बाजीराव पाचपोळ यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या बोदवड शाखेकडे तक्रार केली आहे. अनुदानाबाबत तलाठ्यांकडील यादी मागविल्यानंतर त्यातही तफावत आढळली आहे. स्टेट बॅंकेकडील मागविलेल्या यादीतही अनुदान आठ हजार रुपये जिल्हा बॅंकेकडे वर्ग केले असल्याचे आढळून आले आहे.

बॅंकेकडून उडवाउडवीची उत्तरे
सुरवातीला पहिला हप्ता मिळाला असेल, बाकी रक्‍कम बाकी आहे. बॅंक खातेक्रमांक चुकीचा आहे. त्यामुळे रक्‍कम परत गेली, अशी उडवाउडवीची उत्तरे बॅंकेकडून दिली जात असून, शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
या संदर्भात महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जुमानत नाहीत. या संदर्भात सुधारणा करायला ही मंडळी तयार दिसत नाही, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


इतर बातम्या
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
देऊर शिवारात सिंगल फेज वीज वाहिनी...देऊर, जि. धुळे ः ककाणी, म्हसदी (ता. साक्री)...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
कडेगाव तालुक्यात सत्तर टक्के पिकांचे...कडेगाव, जि. सांगली : तालुक्यात झालेल्या मुसळधार...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...
एफआरपी एकरकमी देणार की तुकडे होणार?सातारा : यावर्षीच्या ऊस हंगामासाठी एक ते दोन...
बार्शीत ओला दुष्काळ मागणीसाठी भारतीय...सोलापूर : ओला दुष्काळ जाहीर करा, या मुख्य मागणीसह...
कृषी योजनांच्या अंमलबजावणीत अकोला अव्वलअकोला ः जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविलेल्या...
पीक नुकसानीची मदत निश्‍चित मिळेल ः मलिकपरभणी : ‘‘हवामान विभागाने रविवार (ता.२५)...
रयत क्रांती संघटनेतर्फे जागरण गोंधळ...पुणे ः  रयत क्रांती संघटनेतर्फे...
इथेनॉल पूर्णत्वासाठी ‘कादवा’ला सहकार्य...नाशिक : ‘‘अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पुन्हा मुसळधार...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांची...
उसाचे ३१ लाख शेतकऱ्यांच्या बँक...नांदेड : ‘‘महाराष्ट्र शुगर (जि. परभणी) या...
मोसंबीत अंबिया बहार फायदेशीर ः डॉ....अंबड, जि. जालना ः ‘‘उन्हाळ्यामध्ये पाण्याची...
नाथाभाऊ काय चीज आहे, दाखवून देऊ : शरद...मुंबई: नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने...
शेतकऱ्यांना मदत करण्याचीच भूमिका : शहालातूर : ‘‘कृषी उत्पन्न बाजार समितीने अडचणीच्या...
नैसर्गिक आपत्तीत पीकच नाई, तर बापही...यवतमाळः नैसर्गिक आपत्तीत आमी पीकच नाई, त आमचा...
राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात कपात नगर ः लॉकडाऊन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावर...