agriculture news in Marathi confusion for cotton procurement Maharashtra | Agrowon

कापूस खरेदीबाबत यंत्रणांमध्येच गोंधळाची स्थिती 

विनोद इंगोले
सोमवार, 20 एप्रिल 2020

खरेदी केंद्र टप्प्याटप्याने सुरु होतील. किती सुरु होतील, याबाबत तुर्तास सांगणे अवघड आहे. ज्या ठिकाणी ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. त्या ठिकाणी खरेदीवर आमचा भर राहील. 
- अनंतराव देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ 

नागपूर ः राज्यात कापूस खरेदीबाबत पणन सचिवांकडून आदेश देण्यात आले असले तरी राज्यात किती केंद्रावर ही खरेदी सुरु होईल किंवा सुरु होणारच नाही याबाबत मात्र स्पष्टता नसल्यामुळे गोंधळ उडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सीसीआयने आम्ही कधीच खरेदी बंद केली नाही, असा दावा केला असून आम्ही खरेदीस तयार आहोत, असा खुलासा केला. पणन महासंघाने ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेल्या केंद्रावर रोज वीसच्या संख्येतील वाहनांमधून कापूस खरेदीस तयार असल्याचे सांगितले. 

राज्यात यावर्षी ४३.८४ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड करण्यात आली. त्यामाध्यमातून ४२५ लाख क्‍विंटल कापसाची उत्पादकता अपेक्षीत आहे. त्यामध्ये १७५ लाख क्‍विंटल विदर्भात तर मराठवाडा व खांदेश भागात २५० लाख क्‍विंटल कापसाचे उत्पादन झाल्याची माहिती ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ गोविंद वैराळे यांनी दिली.

पणन महासंघ तसेच सीसीआयकडून आजवर खरेदी करण्यात आलेल्या कापसानंतरही शेतकऱ्यांच्या घरात ८० लाख क्‍विंटल कापूस शिल्लक आहे. त्यामध्ये विदर्भात ३० लाख तर उर्वरित महाराष्ट्रात ४५ ते ५० लाख क्‍विंटल कापसाचा समावेश आहे. या कापसाची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी होत होती. 

‘ॲग्रोवन’मधून देखील हा प्रश्‍न मांडण्यात आला. त्याची दखल घेत राज्य सरकारने सोमवार (ता.२०) पासून खरेदी सुरु करण्याचे आदेश दिले. राज्यात सीसीआयचे ८५ तर पणन महासंघाचे ७४ केंद्राव्दारे १२७ फॅक्‍टरीमध्ये खरेदी सुरु आहे. लॉकडाऊनच्या काळात खरेदी करताना महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ व सीसीआयकडून टप्याटप्याने खरेदी केंद्र सुरु करण्यात येतील, असे सांगण्यात आले.

ज्या केंद्रावर कापूस येईल, तो आम्ही खरेदी करु असे सीसीआयच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पणन महासंघ आधी नोंदणी केलेल्या केंद्रावर रोज २० वाहनातील कापूस खरेदी करणार आहे. त्यामुळे किती केंद्र सुरु होतील आणि कोठे खरेदी होईल याबाबत सीसीआयने देखील अनभिज्ञता व्यक्‍त केली आहे. 

रुईची टक्‍केवारीचा निकष 
सीसीआयने दर महिन्याला कापसातील रुईची टक्‍केवारी वाढती असावी त्यासोबतच एक क्‍विंटल कापसावर प्रक्रिया केल्यानंतर रुई व सरकीतील वजनात देखील घट प्रत्येक महिन्याला कमी यावी, अशी अट जिनींग व्यवसायीकांवर टाकली आहे. जिनींग व्यवसायीकांमध्ये या धोरणाबद्दल नाराजी आहे. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...
कृषी विधेयकांविरोधात राज्यात शेतकरी...पुणेः केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या कृषी...
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...
ऑनलाइन शिक्षणात बरेच ऑफलाइन! पाऊस आणि शाळा, महाविद्यालयं सुरू होण्याचा काळ...
आता शेतमाल खरेदीचे बोला!ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील खरीप...
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...