सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा गोंधळ

महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. बाधित घरे, इमारती, दुकानांचे पंचनामे करण्यात येत आहेत. शहरातील बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांचे दुकान व गोदाम दोन्हीही पाण्यात गेले होते.
पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा गोंधळ Confusion of flood victims' panchnama
पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा गोंधळ Confusion of flood victims' panchnama

सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. बाधित घरे, इमारती, दुकानांचे पंचनामे करण्यात येत आहेत. शहरातील बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांचे दुकान व गोदाम दोन्हीही पाण्यात गेले होते. यात काही व्यापाऱ्यांची दुकाने व गोदाम वेगवेगळी आहेत. मग त्यांचे स्वतंत्र पंचनामे करणार का, असा सवाल व्यापारी उपस्थित करत आहे. दोन्ही ठिकाणी नुकसान झाले असल्यास त्यांचा पंचनाम्यात समावेश करावा, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. याचबरोबर पंचनाम्याचे निकष कडक केल्याने पूरग्रस्तांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे सरकारने २०१९ प्रमाणे पंचनामा होताच जागेवर रोख रक्कम देऊन त्यांना आधार देण्याची गरज आहे. 

निकषांच्या तिढ्याचा ताप नवेखेड : कृष्णेला आलेला पूर ओसरू लागला आहे. पंचनामे सुरू झाले. पंचनाम्याच्या निकषांवरून प्रशासकीय अधिकारी व पूरग्रस्त यांच्यांत तंटे होऊ लागलेत. बोरगाव, मसुचिवाडी, बनेवाडी, सातपेवाडी, फारणेवाडी, गोंडवाडी, जुनेखेड, नवेखेडला वादाच्या घटना घडल्या आहेत. महापुराने नदीकाठावरील लोकांची दाणादाण उडवली. पै-पाहुणे, मित्रमंडळी, सार्वजनिक ठिकाणी आसरा घेतला. आता घराकडे परतु लागलेत. शासकीय यंत्रणा पंचनाम्यासाठी सक्रिय झाली आहे. पाणी गेलेल्या घरातील कुटुंबालाच सानुग्रह अनुदान मिळणार, अशा सूचना वरिष्ठ पातळीवरून आल्या आहेत.

भिलवडीत काम बंद पाडले भिलवडी : सुखवाडी (ता. पलूस) येथील ग्रामस्थांनी गाव शंभर टक्के पूरबाधित घोषित करून सरसकट पंचनामे करण्याची मागणी करीत पंचनाम्यांचे काम बंद पाडले.  महापुरात सुखवाडीला पाण्याचा वेढा होता. ग्रामस्थ जनावरे व कुटुंबासह स्थलांतरित झाले होते. पुराने घरांबरोबर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गाव शंभर टक्के पूरग्रस्त गाव घोषित करून सानुग्रह अनुदान व शेती नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. पंचनामे करण्यास विरोध केला. काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रांताधिकारी गणेश मरकड, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पलूसचे तहसीलदार निवास ढाणे यांनी ग्रामस्थांशी  संवाद साधला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com