Agriculture news in marathi Confusion of flood victims' panchnama | Agrowon

सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा गोंधळ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. बाधित घरे, इमारती, दुकानांचे पंचनामे करण्यात येत आहेत. शहरातील बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांचे दुकान व गोदाम दोन्हीही पाण्यात गेले होते.

सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. बाधित घरे, इमारती, दुकानांचे पंचनामे करण्यात येत आहेत. शहरातील बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांचे दुकान व गोदाम दोन्हीही पाण्यात गेले होते. यात काही व्यापाऱ्यांची दुकाने व गोदाम वेगवेगळी आहेत. मग त्यांचे स्वतंत्र पंचनामे करणार का, असा सवाल व्यापारी उपस्थित करत आहे.

दोन्ही ठिकाणी नुकसान झाले असल्यास त्यांचा पंचनाम्यात समावेश करावा, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. याचबरोबर पंचनाम्याचे निकष कडक केल्याने पूरग्रस्तांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे सरकारने २०१९ प्रमाणे पंचनामा होताच जागेवर रोख रक्कम देऊन त्यांना आधार देण्याची गरज आहे. 

निकषांच्या तिढ्याचा ताप
नवेखेड : कृष्णेला आलेला पूर ओसरू लागला आहे. पंचनामे सुरू झाले. पंचनाम्याच्या निकषांवरून प्रशासकीय अधिकारी व पूरग्रस्त यांच्यांत तंटे होऊ लागलेत. बोरगाव, मसुचिवाडी, बनेवाडी, सातपेवाडी, फारणेवाडी, गोंडवाडी, जुनेखेड, नवेखेडला वादाच्या घटना घडल्या आहेत. महापुराने नदीकाठावरील लोकांची दाणादाण उडवली. पै-पाहुणे, मित्रमंडळी, सार्वजनिक ठिकाणी आसरा घेतला. आता घराकडे परतु लागलेत. शासकीय यंत्रणा पंचनाम्यासाठी सक्रिय झाली आहे. पाणी गेलेल्या घरातील कुटुंबालाच सानुग्रह अनुदान मिळणार, अशा सूचना वरिष्ठ पातळीवरून आल्या आहेत.

भिलवडीत काम बंद पाडले
भिलवडी : सुखवाडी (ता. पलूस) येथील ग्रामस्थांनी गाव शंभर टक्के पूरबाधित घोषित करून सरसकट पंचनामे करण्याची मागणी करीत पंचनाम्यांचे काम बंद पाडले. 
महापुरात सुखवाडीला पाण्याचा वेढा होता. ग्रामस्थ जनावरे व कुटुंबासह स्थलांतरित झाले होते. पुराने घरांबरोबर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गाव शंभर टक्के पूरग्रस्त गाव घोषित करून सानुग्रह अनुदान व शेती नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. पंचनामे करण्यास विरोध केला. काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रांताधिकारी गणेश मरकड, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पलूसचे तहसीलदार निवास ढाणे यांनी ग्रामस्थांशी 
संवाद साधला.


इतर ताज्या घडामोडी
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...