agriculture news in Marathi confusion regarding scholarship to spot admission Maharashtra | Agrowon

‘स्पॉट अॅडमिशन’च्या शिष्यवृत्तीबाबत संभ्रम 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 मार्च 2021

राज्यात यापुढे कृषी पदवीसाठी ‘स्पॉट अॅडमिशन’मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळणार नसल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. 

पुणे : राज्यात यापुढे कृषी पदवीसाठी ‘स्पॉट अॅडमिशन’मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळणार नसल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, २०१९-२० पर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत संभ्रम कायम आहे. 

केंद्रिभूत पद्धतीशिवाय प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना २०२०-२१ पासून शिष्यवृत्ती मिळणार नाही. शासनाने ही भूमिका अलीकडेच एका बैठकीत पुन्हा स्पष्ट केली. त्यासाठी रिक्त जागेवरील प्रवेश पद्धतीच्या नियमावलीत देखील बदल करण्यात आलेला आहे. 

मुळात कृषी पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा असतो. त्यामुळे ‘स्पॉट अॅडमिशन’मधून प्रवेश घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांना पहिल्या तर काहींना दुसऱ्या वर्षाची शिष्यवृत्ती मिळाली. तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना देखील काही ठिकाणी शिष्यवृत्ती मिळाली. मात्र २०१९-२० मधील विद्यार्थ्यांना या सुविधेतून वगळले गेले आहे. त्याबाबत शासन स्तरावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राज्यात ५१०० विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फटका बसला असून, दहा कोटी रुपये मंजूर झाल्यास ही समस्या सुटू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

...अन्यथा राज्यभर आंदोलन 
प्रलंबित शिष्यवृत्तीबाबत बुधवारी (ता.१७) राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहराध्यक्ष उमेश कोकरे यांच्या नेतृत्वाखाली काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेसमोर निदर्शने केली. तोडगा न काढल्यास पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. 
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...