त्रिसदस्यीय समितीमुळेच अवकाळी भरपाईचा गोंधळ

त्रिसदस्यीय समितीमुळेच अवकाळी भरपाईचा गोंधळ
त्रिसदस्यीय समितीमुळेच अवकाळी भरपाईचा गोंधळ

सांगली (प्रतिनिधी) ः राज्य सरकारने अवकाळीने नुकसान झालेल्यांना भरपाईची घोषणा केली. तालुक्‍यात पंचनामे करणाऱ्या त्रिसदस्यीय समितीच्या गोंधळांमुळे अजून हजारो शेतकरी वंचित आहेत. वंचितांचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी आहे. आटपाडी तालुक्‍यात खरिपाचे २४, रब्बीचे ३४ हजार आणि फळपिकांचे १५ हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. २०१९ मध्ये ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्‍टोबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला. २६ गावांत खरीप, ३४ गावात रब्बी आणि फळपिकांचे अतोनात नुकसान झाले. सरकारने पिकांसाठी हेक्‍टरी आठ, फळपिकासाठी १८ हजार भरपाई जाहीर केली. त्रिसदस्यीय समितीकडून पंचनामे करण्याचे आदेश दिले. महसूलकडून तलाठी, कृषी सेवक आणि ग्रामसेवक अशा तिघांची समिती होती. पंचनाम्यांच्या आदेशानंतर पहिल्या आठवड्यात सदस्यांकडून एकत्रित पंचनामे करण्यात आले.  सरकारने वेगात पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर समितीची धावपळ व गोंधळ उडाला. क्षेत्र जास्त आणि कर्मचारी कमी यामुळे पंचनामे वेळेत होणार नसल्याने तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवकांनी स्वतंत्रपणे पंचनामे केले. त्यामुळे गोंधळ झाला आहे. शेतात जाऊन पंचनामे करणे शक्‍य होणार नसल्याने शेतकऱ्यांना अर्ज, पासबुक, आधार कार्ड झेरॉक्‍स, सातबारा ग्रामपंचायतीत जमा करण्याचे तोंडी आदेश दिले. बॅंक पासबुक, आधार कार्डची झेरॉक्‍स, अर्ज ग्रामपंचायतीत जमा करण्यात आले. मात्र कागदपत्रे सदस्यांकडे पोचली नाहीत. अनेकांनी जबाबदारीने कागदपत्रे गोळा केली नाही. ज्यांची कागदपत्रे मिळाली तेवढ्याच लोकांची यादी बनवून महसूलकडे पाठवून दिली. त्यानुसार भरपाई मिळाली.  मात्र, ज्यांची कागदपत्रे पोचली नाहीत ते भरपाईपासून वंचित राहिलेत. शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली. मात्र, दखल न घेतल्यामुळे प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली. शेतकरी महसूल, कृषीकडे चौकशी करीत आहेत. मात्र टोलवाटोलवीची उत्तरे मिळत आहेत. हजारोंचे अर्ज, कागदपत्रे गायब झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com