नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या संसर्गाची लाट अधिक तीव्र झाली असताना सर्वोच्च न्यायालयान
ताज्या घडामोडी
ड्रोनद्वारे फवारणीसंदर्भात वाढतोय संभ्रम
ड्रोनद्वारे फवारणी शेतकऱ्यांसाठी फायद्याचे तंत्रज्ञान ठरणार आहे. परंतु त्यातील फायदे, तोटे अभ्यासण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित करारदारांकडे प्रात्याक्षिकाकामी ड्रोनची मागणी केली आहे. अभ्यासाअंती निरीक्षण नोंदवित याची शिफारस केली जाईल.
- डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
अमरावती ः ड्रोनद्वारे फवारणीचा प्रयोग काही अंशी यशस्वी झाला असतानाच, या फवारणीसंदर्भाने दोन मतप्रवाह पुढे येत असल्याने कृषी विभागातच आता या विषयावर संभ्रम वाढीस लागला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मात्र ड्रोन फवारणीसंदर्भाने आशावादी असल्याने त्यांनी मात्र चाचणीकरिता ड्रोनची मागणी केली आहे.
पॅडसन्स इंडस्ट्रीज तसेच हैदराबाद येथील ड्रोन उत्पादक थॉनस कंपनीच्या माध्यमातून अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीचा प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर ड्रोनद्वारे फवारणीच्या मुद्द्याला हवा मिळाली. लातूर येथे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या उपस्थितीत ड्रोनद्वारे फवारणीचा प्रयोग करण्यात आला. यापूर्वी दिल्ली येथे कृषी मंत्रालयात ड्रोनद्वारे फवारणीचे सादरीकरण देशभरातील कृषी अधिकाऱ्यांकरिता झाले होते. त्यानंतर प्रत्येक विभाग स्तरावर ड्रोन खरेदीच्या हालचालींना वेग आला होता. आता मात्र काही पर्यावरणवाद्यांचा ड्रोनद्वारे फवारणीला विरोध होऊ लागला आहे.
पर्यावरणाला बाधा पोचेल, कीटकनाशकाची मात्रा अधिक लागेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ होईल, अशीदेखील ओरड होऊ लागली. परिणामी आता कृषी विभाग स्तरावर सावध पावले उचलली जात असल्याचे वृत्त आहे.
ड्रोनद्वारे फवारणी फायदेशीर ठरणारी आहे. मानवी आरोग्यालादेखील यामध्ये धोका नाही. नियोजनबद्धरीत्या फवारणी याद्वारे शक्य होते. त्यामुळे शासन स्तरावर या संदर्भाने पाठपुरावा केला जाईल, असे राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले.
पीकात रसायनाचा किती अंश राहतो, कीटकनाशकाची मात्रा अधिक लागते किंवा काय, या संदर्भाने अद्याप अभ्यास नाही. त्यामुळे ड्रोनद्वारे फवारणीच्या विषयावर अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही, असे अमरावती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी सांगितले.
- 1 of 1101
- ››