ईव्हीएम विरोधी लढ्यात कॉंग्रेसचाही सहभाग : वडेट्टीवार

ईव्हीएम विरोधी लढ्यात कॉंग्रेसचाही सहभाग : वडेट्टीवार
ईव्हीएम विरोधी लढ्यात कॉंग्रेसचाही सहभाग : वडेट्टीवार

नागपूर : देशाला ईव्हीएम मुक्‍त करण्यासाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वात सर्व पक्ष क्रांतीदिनी ९ ऑगस्टला एकत्र येत आहेत. कॉंग्रेसदेखील या लढ्यात सहभागी असेल, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वडेट्टीवार म्हणाले, की क्रांतीदिवसाला इंग्रजांविरोधात ‘चले जाव''चा नारा देण्यात आला होता. आज देशात तशीच स्थिती असून निवडणुकांची जबाबदारी असलेला निवडणूक आयोग कुणाच्या तरी हातातील कठपुतली असल्याप्रमाणे भूमिका घेत आहे. ईव्हीएम संदर्भात निवडणूक आयोगात दुमत आहे. देशात अशी स्थिती कधीही उदभवली नव्हती. निवडणूक आयोगाने आम्हाला बोलवावे. आम्ही ईव्हीएमचा फोलपणा सिद्ध करून दाखवू. राज ठाकरे यांनी सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात ईडीची चौकशी लावून त्यांचा आवाज दाबण्याचा सरकारने प्रयत्न करू नये. 

राज्य शासनाच्या भूमिकेमुळे राज्यातील सहकार क्षेत्राचे वाटोळे झाले आहे. सर्वच क्षेत्रात नैराश्‍य असून बेरोजगारीचे प्रमाण देखील वाढीस लागले आहे. सर्वच क्षेत्रातील योजनांमध्ये अपयश आल्यानंतर ते लपविण्यासाठीच म्हणून महाजनादेश यात्रा काढण्याची वेळ सरकारवर आली आहे. सरकारने प्रामाणिकपणे कामे केली असती तर ही वेळच आली नसती. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना अलीबाबा चालीस चोर भाजपची नेते मंडळी म्हणायची, आता त्याच नेत्यांची सापळा लावून शिकार केली जात आहे. भाजपात आल्यानंतर त्यांच्या दृष्टीने चोर असलेले लोक आता पवित्र झाले का ? असा प्रश्‍नदेखील वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com