agriculture news in marathi, congress and alliance parties discussion on alternate government, mumbai, maharashtra | Agrowon

पर्यायी सरकारसाठी काँग्रेस आघाडीत खलबते
टीम अॅग्रोवन
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

मुंबई : अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद आणि समान सत्तावाटपाच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपमध्ये समेट होण्याची शक्यता मावळल्यानंतर पर्यायी सरकारसाठी काँग्रेस आघाडीत खलबते सुरू झाली आहेत. यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शुक्रवारी (ता.८) रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या बैठकीत राज्यात बिगर भाजप सरकारचा पर्याय देण्याबाबत चाचपणी करण्यात आली.

मुंबई : अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद आणि समान सत्तावाटपाच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपमध्ये समेट होण्याची शक्यता मावळल्यानंतर पर्यायी सरकारसाठी काँग्रेस आघाडीत खलबते सुरू झाली आहेत. यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शुक्रवारी (ता.८) रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या बैठकीत राज्यात बिगर भाजप सरकारचा पर्याय देण्याबाबत चाचपणी करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेवर तोंडसुख घेतले. फडणवीस यांच्या पाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका करताना मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार या निर्धाराचा पुनरूच्चार केला. युतीतील या बेबनावाच्या पार्श्वभूमीवर आघाडीने आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेस नेत्यांनी रात्री उशिरा 'सिल्व्हर ओक'वर जाऊन शरद पवार यांच्याशी राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. भाजपला वगळून राज्यात स्थिर सरकार देता येणे शक्य आहे काय? शिवसेनेला सोबत घेऊन सरकार बनवता येईल काय? यावर चर्चा झाली. ही चर्चा करताना राज्यपालांच्या निर्णयापर्यंत थांबण्याचे दोन्ही काँग्रेसने ठरवले आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, मावळत्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी उपस्थित होते.

‘राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष’
राज्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय परिस्थितीबाबत आम्ही शरद पवार यांच्याशी चर्चा केली. देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांच्या भूमिकेनंतर राज्यातील स्थिती आणखी गडद झाली आहे. आता यातून मार्ग काढण्याची जबाबदारी राज्यपालांची आहे. प्रक्रियेनुसार राज्यपालांनी विधानसभेतील सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले पाहिजे. त्यामुळे राज्यपालांच्या भूमिकेकडे आमचे लक्ष आहे. युतीला जनादेश मिळूनही तो पाळायला तयार नाहीत. राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीला सर्वस्वी भाजप जबाबदार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. पर्यायी सरकारच्या संदर्भात आमची कोणतीही रणनीति नाही. राज्यात बिगर भाजप सरकार यावे, अशी आमची भावना असली तरी आमच्याकडे तेवढे संख्याबळ नाही, असेही थोरात म्हणाले.

‘भाजप सरकार बनविणार नाही’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन भाजप सरकार बनवू शकणार नाही, अशी कबुली दिल्याचे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. पाच वर्षांतील नाकर्तेपणामुळे जनतेने फडणवीस सरकारला नाकारले आहे. विधानसभेत २२० जागा मिळविण्याचा त्यांचा दावा फोल ठरला. राज्यात भाजपचे सरकार येणार नसल्याने आम्ही आघाडीच्या मित्र पक्षांशी चर्चा केली, असेही त्यांनी सांगितले. विधानसभेची मुदत संपल्यानंतर फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून तरी राहता येईल काय? याचा खुलासा झाला पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
पेरणीपूर्व मशागतीय पद्धतीने करा...रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई व सूर्यफूल...
कांदा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य...कांदा उत्पादकता कमी होण्यासाठी असंतुलित खत...
जळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...
वऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...
सांगली जिल्ह्यात भूजल पातळी ५८...सांगली : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा...
नाशिक : भिजलेल्या पिकांमुळे चाऱ्याचा...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने...
धक्कादायक, एकाच गावातल्या ६०० मेंढ्या...नगर  ः मागील महिन्यात अतिवृष्टीने पारनेर...
अधिक उपसा केला तर पाणी टंचाईची शक्यता...लातूर : जिल्ह्यात पावसाळ्याच्या चारही महिन्यांत...
नाशिक जिल्ह्यात नुकसानीपोटी १८१ कोटींची...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेस...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांना...
नाशिक जिल्ह्यात टोमॅटोला गेले तडे ! ५०...नाशिक  : मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यामुळे...
...'या' सिंचन योजनेची पाणीपट्टी होणार...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टीची...
किसान सभेकडून विमा कंपनीला २८...पुणे : पुण्यातील दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडून...
हैबतबाबांच्या पायरीपूजनाने आळंदीत...आळंदी, जि. पुणे  ः टाळ-मृदंगाचा निनाद आणि...
गूळ सौदे सुरू करण्यासाठी दोन्ही घटकांना...कोल्हापूर  : गेल्या दोन दिवसांपासून व्यापारी...
सांगली जिल्ह्यात ऊस दरासाठी ‘स्वाभिमानी...सांगली : जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू होताच...
कोल्हापुरात कारखान्यांकडून ऊसतोड सुरू...कोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून...
जळगावात भरताची वांगी १५०० ते २६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
बटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा...बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड...