काँग्रेसची ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

काँग्रेसची ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
काँग्रेसची ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई ः घटस्थापनेच्या मुहूर्तावर काँग्रेसने रविवारी (ता. २९) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची नावे आहेत. काँग्रेसचे जे परंपरागत व ज्या जागेबद्दल वाद नाहीत, अशा मतदारसंघांचा या यादीत समावेश असल्याचे दिसून येते.

यादीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम, अमित देशमुख, नितीन राऊत आदींचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमधून, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना ब्रह्मपुरी येथून, सोलापूर शहर मध्यमधून विद्यमान आमदार प्रणिती शिंदे, तर लातूर शहरमधून अमित देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच डॉ. विश्वजित पतंगराव कदम पलूस-कडेगावमधून, पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघातून रमेश बागवेंना, भोरमधून संग्राम थोपटेंना, पुरंदरमधून संजय जगताप यांना, तर जत विधानसभा मतदारसंघातून विक्रम सावंत यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आहे.

काँग्रेस आपली पहिली यादी २० सप्टेंबरला जाहीर करणार असल्याचे आधी म्हटले जात होते. त्यानंतर २१ तारखेला विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. त्यामुळे २३ सप्टेंबरला पहिली यादी जाहीर करण्याचा मुहूर्त ठरला, मात्र तोही अखेर लांबला. आता पितृपक्ष संपल्यानंतर काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

काँग्रेसची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी ः अॅड. के. सी. पाडवी - अक्कलकुवा (नंदुरबार), पद्माकर वळवी - शहादा (नंदुरबार), शिरीष नाईक - नवापूर (नंदुरबार), शिरीष चौधरी - रावेर (जळगाव), हर्षवर्धन सपकाळ - बुलडाणा (बुलडाणा), अनंत वानखेडे - मेहकर (बुलडाणा), अमित झनक - रिसोड (वाशीम), वीरेंद्र जगताप - धामणगाव रेल्वे (अमरावती), यशोमती ठाकूर - तिवसा (अमरावती), अमर काळे - आर्वी (वर्धा), रणजित कांबळे - देवळी (वर्धा), सुनील केदार - सावनेर (नागपूर), नितीन राऊत - नागपूर उत्तर (नागपूर), विजय वडेट्टीवार - ब्रह्मपुरी (चंद्रपूर), सतीश वर्जूरकर - चिमूर (चंद्रपूर), प्रतिभा धानोरकर - वरोरा (चंद्रपूर), बाळासाहेब मंगळूरकर - यवतमाळ (यवतमाळ), अशोक चव्हाण- भोकर (नांदेड), डी. पी. सावंत - नांदेड उत्तर (नांदेड), वसंतराव चव्हाण - नायगाव (नांदेड), रावसाहेब अनंतपूरकर - देगलूर (नांदेड), संतोष टारफे - कळमनुरी (हिंगोली), सुरेश वर्पूरडकर - पाथरी (परभणी), कल्याण काळे - फुलंब्री (औरंगाबाद), शेख आसिफ शेख रशीद - मालेगाव मध्य (नाशिक), रोहित साळवे - अंबरनाथ (ठाणे), सय्यद हुसेन - मीरा भाईंदर (ठाणे), सुरेश कोपरकर - भांडुप पश्चिम (मुंबई), अशोक जाधव - अंधेरी पश्चिम (मुंबई), नसीम खान - चांदिवली (मुंबई), चंद्रकांत हंडोरे - चेंबूर (मुंबई), झिशान सिद्दीकी - वांद्रे पूर्व (मुंबई), वर्षा गायकवाड - धारावी (मुंबई), गणेश कुमार यादव - सायन कोळीवाडा (मुंबई), अमीन पटेल - मुंबादेवी (मुंबई), अशोक जगताप - कुलाबा (मुंबई), माणिक जगताप - महाड (रायगड), संजय जगताप - पुरंदर (पुणे), संग्राम थोपटे - भोर (पुणे), रमेश बागवे - पुणे कँटोनमेंट (पुणे), बाळासाहेब थोरात - संगमनेर (अहमदनगर), अमित देशमुख - लातूर शहर (लातूर), अशोक पाटील निलंगेकर - निलंगा (लातूर), बसवराज पाटील - औसा (लातूर), मधुकरराव चव्हाण - तुळजापूर (सोलापूर), प्रणिती शिंदे - सोलापूर मध्य (सोलापूर), मौलबी सय्यद - सोलापूर दक्षिण (सोलापूर), ऋतुराज पाटील - कोल्हापूर दक्षिण (कोल्हापूर), पी. एन. पाटील सडोलीकर - करवीर (कोल्हापूर), डॉ. विश्वजित कदम - पलुस कडेगाव (सांगली), विक्रम सावंत - जत (सांगली).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com