agriculture news in marathi, Congress changes Chandrapur Candidate | Page 2 ||| Agrowon

नाट्यमय घडामोडीत काॅँग्रेसने चंद्रपूरचा बदलला उमेदवार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मार्च 2019

चंद्रपूर  ः विनायक बांगडे यांच्या उमेदवारीला जिल्हाभरातून झालेला विरोध. पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याच्या इशाऱ्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीत अखेरीस बांगडे यांच्याऐवजी बाळू धानोरकर यांना काॅँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. 

चंद्रपूर  ः विनायक बांगडे यांच्या उमेदवारीला जिल्हाभरातून झालेला विरोध. पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याच्या इशाऱ्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीत अखेरीस बांगडे यांच्याऐवजी बाळू धानोरकर यांना काॅँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. 

वरोरा-भद्रावती मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर लोकसभेच्या उमेदवारीकरिता काॅँग्रेसच्या संपर्कात होते. भाजपने शिवसेना आणि नेतृत्वाचा सातत्याने अपमान केल्याचा आरोप करीत त्यांनी आमदारकी आणि पक्ष सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला. काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेत त्यांनी काॅँग्रेस प्रवेशाची तयारी केली. मात्र, त्यांच्या उमेदवारीला जिल्ह्यातील काॅँग्रेसच्या एक गटाकडून विरोध झाला. त्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेशही रखडला. याचवेळी काॅँग्रेसच्या एका गटातून काटोलचे आमदार आशिष देशमुख यांच्यासाठी लॉबिंग सुरू झाली.

त्यांचे नाव मागे पडल्यानंतर विलास मुत्तेमवार यांचा मुलगा विशाल मुत्तेमवार यांच्या उमेदवारीची चर्चा झाली. जिल्ह्यातील सर्वच गटाच्या नेत्यांनी विशाल मुत्तेमवार यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने अखेरीस त्यांनीच माघार घेतली. दरम्यान, काॅँग्रेसने ऐनवेळी विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर बांगडे यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात काॅँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही नाराजी पुढे आली.

माध्यमांमध्ये चंद्रपूरच्या उमेदवारीवरून चव्हाण राजीनामा देत असल्याची चर्चा सुरू झाली. या साऱ्या नाट्यमय घडामोडीनंतर काही नेते दिल्लीत धानोरकर यांच्या उमेदवारीसाठी ठाण मांडून होते. शिवाजीराव मोघे, आमदार विजय वडेट्टीवार आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण देखील दिल्लीत पोचले. त्यानंतर उशिरा विनायक बांगडे यांना बदलून बाळू धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

इतर ताज्या घडामोडी
हवाई दलाने केली चार मच्छीमारांची सुटकाजम्मू, : भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या...
सोलापुरात डाळिंबाच्या दराची उसळीसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
बऱ्हाणपुरात केळीला १८०० रुपयांपर्यंत दरजळगाव : खानदेशसह लगतच्या मध्य प्रदेशात केळीच्या...
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...