agriculture news in Marathi Congress demanding 2 seats of vidhan parishad Maharashtra | Agrowon

आघाडीत जागावाटपाचा पेच, काँग्रेस दोन जागांसाठी आग्रही 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 मे 2020

काँग्रेसने दोन जागांचा आग्रह कायम ठेवल्याने महाराष्ट्र विकास आघाडीत विधानपरिषदेच्या जागावाटपाचा पेच गुरुवारी (ता.७) कायम होता.

मुंबई: काँग्रेसने दोन जागांचा आग्रह कायम ठेवल्याने महाराष्ट्र विकास आघाडीत विधानपरिषदेच्या जागावाटपाचा पेच गुरुवारी (ता.७) कायम होता. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारांची घोषणा लांबणीवर पडली आहे. विरोधी पक्ष भाजपनेही आपले उमेदवार गुलदस्त्यात ठेवले आहेत. 

विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होऊ घातली आहे. राज्यात कोरोनाचे संकट असल्याने निवडणूक बिनविरोध करावी असा मतप्रवाह आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या निवडणुकीतील उमेदवार असल्याने मतदान टळावे, असा शिवसेनेचा प्रयत्न आहे. 

विधानसभेतील पक्षनिहाय संख्याबळानुसार भाजपचे तीन, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे नवव्या जागेसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षात चुरस आहे. भाजपला चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडीपेक्षा कमी मतांची गरज आहे. मतदान गुप्त असल्याने भाजप चौथी जागा लढविण्यावर ठाम आहे. चार जागा सोडल्या तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे भाजप नेत्यांचे मत आहे. 

राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला दोन जागा सुटल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत दोन जागा मिळाव्यात असा युक्तिवाद काँग्रेसकडून केला जात आहे. यासंदर्भात आघाडीच्या नेत्यांच्या बैठका होऊनही तोडगा निघालेला नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी बोलून मार्ग काढणार आहेत. त्यामुळे शनिवार, रविवारपर्यंत तोडगा निघण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी शनिवारचा (ता.९) एकच दिवस शिल्लक आहे. 

इच्छुक उमेदवार 
राष्ट्रवादी काँग्रेस : शशिकांत शिंदे, सुरेखा ठाकरे, रुपाली चाकणकर, शिवाजीराव गर्जे, अदिती नलावडे, महेश तपासे, परवेज कोकणी 

काँग्रेस : नसीम खान, अनिस अहमद, माणिकराव ठाकरे, मुजफ्फर हुसेन, चारूलता टोकस, सचिन सावंत, गणेश पाटील, राजेश शर्मा 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...