agriculture news in marathi, Congress doubts about surgical strike: Modi | Agrowon

काँग्रेसला सर्जिकल स्ट्राइकबाबत शंका : मोदी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

भिलवाडा (राजस्थान), (वृत्तसंस्था) : मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, त्या वेळी सत्तेत असलेली कॉंग्रेसच पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केलेल्या भाजप सरकारला प्रश्‍न विचारत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता. २६) केली. नक्षलवाद आणि दहशतवादावरून त्यांनी कॉंग्रेसला आज धारेवर धरले.

भिलवाडा (राजस्थान), (वृत्तसंस्था) : मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, त्या वेळी सत्तेत असलेली कॉंग्रेसच पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केलेल्या भाजप सरकारला प्रश्‍न विचारत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता. २६) केली. नक्षलवाद आणि दहशतवादावरून त्यांनी कॉंग्रेसला आज धारेवर धरले.

पंतप्रधान मोदींनी आज येथे निवडणूक प्रचारसभा घेतली. ‘कॉंग्रेसने देशभक्तीचे धडे दिले आहेत. मात्र, लष्कराने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करताच त्यांनी पुरावा म्हणून कारवाईचा व्हिडिओ मागितला. जवान आपला जीव हातात घेऊन लढतात, कॅमेरा नाही. कॉंग्रेसच्याच काळात २६/११चा हल्ला झाला होता. या हल्ल्यातील दोषींना शिक्षा होईलच, याबाबत जनतेने सरकारवर विश्‍वास ठेवावा,’ असे मोदी म्हणाले. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांना आणि बळी पडलेल्यांच्या दु:खात सहभागी असल्याचेही मोदी यांनी सांगितले.

भाजप शासनाच्या काळात नक्षलवाद आणि दहशतवाद यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जात असून, हल्ल्याच्या घटनाही कमी झाल्याचा दावा मोदी यांनी केला. नक्षलवादी हे लहान मुलांच्या हाती शस्त्र देऊन निष्पापांचा बळी घेत आहेत आणि कॉंग्रेस नेते मात्र या नक्षलवाद्यांना क्रांतिकारक असल्याचे प्रमाणपत्र देत आहेत, अशी टीकाही मोदींनी केली. आजच्या संविधान दिनानिमित्त मोदी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या योगदानाचेही स्मरण केले.

मोदी उवाच...
निवडणूक जवळ येताच माझ्या जातीबाबत आणि वडिलांबाबत विचारले जाते, पंतप्रधान हा देशातील सर्व जनतेच्या जातींचा प्रतिनिधी असतो,मी कधीही सुटी घेतली नाही, मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी घेऊ शकतो, भाजप सरकारच्या प्रयत्नांमुळे ६५ टक्के गावांमध्ये शौचालय, कॉंग्रेस काम करणार नाही, जात मात्र विचारेल.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत पावसाचा कमी-...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ४२१ पैकी तब्बल २७५...
कोल्हापूर, सिंधुदुर्गात पावसाची रिपरिपकोल्हापूर, सिंधुदुर्ग : सप्टेंबरच्या पहिल्या...
शेतीमाल तारण कर्ज योजनेसाठी एक कोटीपरभणी : ‘‘परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे...
पाचोरा, जामनेरातही १०० टक्के पाऊसजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळ्यात या...
‘टेंभू‘चे पाणी आटपाडीत, शेतकऱ्यांना...आटपाडी जि. सांगली :  टेंभू पंपगृहातील पंपात...
‘शेतकरी सन्मान योजने‘च्या अनुदानासाठी...कळमनुरी : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत...
तीन कारखान्यावरील कारवाई अंतिम टप्प्यातसोलापूर : ‘‘सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोचवण्याचे...अमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरीनाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील...
तोलाई परिपत्रक होणार रद्द पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी २० हजार कोटी दिले...नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत त्यांना मदत...
‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून...नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव तसेच...
शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची...सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास...
थकीत बिलासाठी मुंबईत दुग्धविकास आयुक्त...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध...
आर्थिक मंदीमुळे देशातील शेती क्षेत्राला...नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात...
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...सातारा ः माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना...
विषबाधेच्या चौकशीची फाइल अडली गृह...नागपूर: प्रशासन गतिमान असल्याचा दावा सरकारकडून...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...