काँग्रेस 'यूपी'त स्वबळावर ऐंशी जागा लढणार

काँग्रेस 'यूपी'त स्वबळावर ऐंशी जागा लढणार
काँग्रेस 'यूपी'त स्वबळावर ऐंशी जागा लढणार

लखनौ : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष (सप) आणि बहुजन समाज पक्षाने (बसप) वेगळी आघाडी स्थापन केल्यानंतर एकाकी पडलेल्या कॉंग्रेसने स्वबळावर लोकसभेच्या ८० जागा लढण्याचा निर्धार केला आहे. राज्यसभेतील कॉंग्रेसचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आझाद म्हणाले, ''यूपीत लोकसभेच्या ऐंशी जागा लढविण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली असून आम्ही स्वत:च्या ताकदीवर लढू आणि दुप्पट जागा जिंकू. आम्ही आघाडी तोडलेली नाही. लोकांना देखील हे माहिती आहे. याआधीही आम्ही भाजपला पराभूत करू पाहणाऱ्या कोणत्याही पक्षासोबत जाण्याची आमची तयारी असल्याचे बोललो होतो तसेच आमचा पक्ष कोणावरही बळजबरी करणार नसल्याचे म्हटले होते. सप आणि बसप आघाडीने हा मुद्दाच संपुष्टात आणला आहे. आम्ही आमची लढाई ताकदीने लढू.''  यावेळी पत्रकार परिषदेला उत्तरप्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर देखील उपस्थित होते. दुबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू आणि सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का देऊ असे विधान केले होते. आज आझाद यांनीही पत्रकार परिषदेत तोच राग आळवला. राज्यातील सप आणि बसप आघाडीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसमध्ये आता निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी जोरदार विचारमंथन होऊ लागले आहे. येथील पक्षाच्या मुख्यालयामध्ये आज ज्येष्ठ नेत्यांच्या बैठका पार पडल्या. कॉंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी केली असली तरीसुद्धा काही जागांवर पक्ष जाणीवपूर्वक उमेदवार देणे टाळू शकतो असे एका ज्येष्ठ नेत्याने खासगीत बोलताना सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com