भाजपच्या गडाला काँग्रेसने लावला सुरुंग

Congress has set up a tunnel for BJP's fort
Congress has set up a tunnel for BJP's fort

नागपूर ः संघ मुख्यालय, भाजपचा गड अशाप्रकारे होमपिच असतानाही जिल्हा परिषदेत भाजप नेत्यांना अपेक्षित खेळी खेळता आली नाही. परिणामी, गेल्या वेळच्या २१ जागांवरून १५ जागांवरच समाधान मानावे लागले. भाजप नेतृत्वाला हा मोठा धक्‍का मानला जात आहे.

नागपूर जिल्हा परिषदेत भाजप शिवसेना युतीची एकहाती सत्ता होती. पाच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर निवडणूक प्रक्रिया कायदेशीर गुंत्यात अडकली. परिणामी अडीच वर्षे वाढीव कार्यकाळ भाजपला मिळाला. आरक्षणाची टक्‍केवारी वाढल्यामुळे हा गुंता निर्माण झाला होता. 

दरम्यान वाडी, महादुला, हुडकेश्‍वर-नरसाळा आदी सर्कल नगरपालिका तसेच नगरपंचायतीत परावर्तित झाले. त्यामुळेदेखील जिल्हा परिषदेच्या निवडणूक कार्यक्रम लांबणीवर पडला. २०१४ मध्ये युती तुटल्यामुळे राज्यात भाजप-शिवसेना स्वतंत्र लढले. त्यानंतर २०१९ मध्ये युती न झाल्याचा फटकाही भाजपला बसल्याचे निकालावरून दिसून येते. 

नागपूर जिल्हा परिषदेत यापूर्वी भाजप-शिवसेनेची युती होती. या वेळी दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. भाजपचे गेल्या वेळी २१ सदस्य होते. या वेळी सहा जागांचे नुकसान पक्षाला सोसावे लागले. भाजपचे या वेळी १५ सदस्य निवडून आले आहेत. शिवसेनेला या वेळी मोठा फटका बसला. २०१२ मध्ये आठ सदस्य असलेल्या शिवसेनेचा या वेळी एकच सदस्य निवडून आला. राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेलादेखील हा मोठा धक्‍का मानला जात आहे. भाजप, शिवसेनला या निवडणुकीत अतिआत्मविश्‍वास नडल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा झंझावात विधानसभा निवडणुकीतील यशाचा झंझावात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने कायम ठेवला आहे. काँग्रेसने या वेळी ३०, तर राष्ट्रवादी काँग्रेसने १५ जागांवर विजय मिळविला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com