agriculture news in marathi, Congress MP Shri Chavan's meet to farming minister for onion rate | Agrowon

कांदाप्रश्‍नी खासदार चव्हाण यांचे कृषिमंत्र्यांना साकडे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 डिसेंबर 2018

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सततचा पाठपुरावा सुरू आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची नवी दिल्ली येथे नुकतीच भेट घेतली.

गेल्या २० वर्षांपासून कांद्याचा प्रश्‍नाचे व्यवस्थापन होत नसल्याचे चित्र आहे. कांदा दराच्या तेजी-मंदीकडे दीर्घकालीन व्यवस्थापनाची संधी म्हणूनही पाहता येईल, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली. तसेच तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी कृषिमंत्र्यांकडे केली.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सततचा पाठपुरावा सुरू आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची नवी दिल्ली येथे नुकतीच भेट घेतली.

गेल्या २० वर्षांपासून कांद्याचा प्रश्‍नाचे व्यवस्थापन होत नसल्याचे चित्र आहे. कांदा दराच्या तेजी-मंदीकडे दीर्घकालीन व्यवस्थापनाची संधी म्हणूनही पाहता येईल, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली. तसेच तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी कृषिमंत्र्यांकडे केली.

किमान दहा वर्षांसाठी कांदा निर्यात धोरण निश्चित करणे, खासगी क्षेत्राच्या साह्याने किमान एक महिन्याच्या सुमारे १२ ते १५ लाख टन संरक्षित कांद्याच्या साठ्याची व्यवस्था करणे, शीतगृहे उभारणे, त्यासाठी अनुदान देणे, महाराष्ट्राखेरीज अन्य राज्यांत शेतकऱ्यांना कांदा चाळींसाठी अनुदान देणे, सूक्ष्मसिंचनासाठी किमान ५० टक्के अनुदान देणे, कांदा निर्यातीसाठी कायमस्वरूपी निर्यात अनुदान निश्चित करणे, अमेरिकेतील कृषी खात्याच्या धर्तीवर मासिक मागणी आणि पुरवठ्याचा अहवाल प्रसिद्ध करणे, देशांतर्गत कांदा लागवड आणि उत्पादनाची आकडेवारी देणारी यंत्रणा सक्षम आणि पारदर्शी करणे आदी मागण्या चव्हाण यांनी सिंह यांच्याकडे केल्या. 

सरकार सकारात्मक
कायमस्वरूपी कांदा निर्यात सुरू ठेऊन अनुदान देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे राधामोहन सिंह यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत त्याबाबत निर्णय होण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याचेही सांगितले. या वेळी नांदगावचे माजी जि. प. सदस्य राजेंद्र पवार, सुदामराव थेटे-पाटील, बापूसाहेब जाधव यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेचा ७६ कोटींचा निधी...अकोला  ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या...
हिंगोली जिल्ह्यात ५९ कोटींचे पीककर्ज...हिंगोली   ः हिंगोली जिल्ह्यातील विविध...
कापूस, सोयाबीन उत्पादक विमा...गडचिरोली: धान उत्पादक ३४ हजार शेतकऱ्यांना सुमारे...
नांदेडमध्ये ४७ कोटी ४७ लाखांचे पीक कर्ज...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बॅंकांनी...
जालन्यात पाच हजार टन खते एकाच दिवशी...जालना  : जिल्ह्यात एकाच दिवशी पाच हजार...
कर्जमुक्‍ती योजनेची प्रक्रिया ३०...भंडारा ः शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव...
जयपूरमध्ये वीज पडून लाखो रुपयांच्या...नाशिक : पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर बागलाण...
बुलडाणा जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत...बुलडाणा  : यंदा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस...
भाजीपाल्याची थेट खरेदी विक्री व्यवस्था...पुणे ः कोरोना टाळेबंदीमध्ये शहरातील विविध भागात...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीसातारा ः जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर पावसाने हजेरी...
कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोकोयवतमाळ ः महागाव तालुक्‍यातील गुंज येथील...
पुणे जिल्ह्यात पीककर्ज वितरणात...पुणे ः लाॅकडाऊनच्या काळात होरपळून निघालेल्या...