काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गटनेत्यांना फटका

काँग्रेसचे गटनेते तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शेखर कोल्हे यांना आरक्षणाचा फटका बसला असून, त्यांचे मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या  गटनेत्यांना फटका Congress, NCP Hit the group leaders
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या  गटनेत्यांना फटका Congress, NCP Hit the group leaders

नागपूर  : काँग्रेसचे गटनेते तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शेखर कोल्हे यांना आरक्षणाचा फटका बसला असून, त्यांचे मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे त्यांना चार वर्षे थांबण्याशिवाय पर्याय राहिला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरच आता त्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. 

  पन्नास टक्क्यांपेक्षा आरक्षणाची मर्यादा अधिक झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून ओबीसींसाठी राखीव असलेल्या जिल्हा परिषदेच्या १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. या सर्व जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यातून भरण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला असून, नव्याने निवडणूक घेण्यात येणार आहे. या करिता १६ जागांसाठी आरक्षणाची सोडत  काढण्यात आली. सदस्यत्व रद्द झालेल्यांमध्ये उपाध्यक्ष मनोहर कुंभारे,  विरोधी पक्ष नेते अनिल निधान, राष्ट्रवादीचे गट नेते चंद्रशेखर कोल्हे, पूनम जाधव, अर्चना भोयर, अवंतिका लेकुरवाळे, राजेंद्र हरडे, अर्चना गिरी, सुचिता ठाकरे, कैलास राऊत, भोजराज ठवकर, योगेश देशमुख, समीर उमप, ज्योती शिरसकर, रेवती बोरके, ज्योती राऊत यांचा समावेश आहे.

महिलांसाठी आरक्षित सर्कल  सावरगाव, पारडसिंगा, वाकोडी, केळवद, करंभाड, वडोदा, डिगडोह, इसासनी डिगडोह 

हे सदस्य बचावले  योगेश देशमुख (अरोली) , कैलास राऊत (बोथिया पालोरा), अनिल निधान (गुमथळा), राजेंद्र हरडे (नीलडोह), भोजराज ठवकर (राजोला) समीर उमप (येनवा) हे सदस्य बचावले असून, त्यांना पुन्हा लढण्याची संधी आहे. 

 महिलांच्या जागी महिलाच  ज्योती शिरसकर (वाकोडी), अर्चना भोयर (करंभाड), अवंतिका लेकुरवाळे (वडोदा), देवका बोडके (सावरगाव), अर्चना गिरी (डिगडोह-इसासनी) हे मतदारसंघ महिलांसाठी राखीव असून, येथे महिलाच सदस्य आहेत. त्यामुळे यांनाही परत संधी मिळू शकते. 

हे झाले खुले  ज्योती राऊत (गोधनी रेल्वे), पुनम जाधव (भिष्णूर सर्कल), सुचिता ठाकरे (डिगडोह) या मतदारसंघात महिला निवडून आल्या आहेत. त्यांच्या ऐवजी आता पुरुष सदस्यांना येथून लढण्याची संधी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com