राज्यातील काॅँग्रेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ः विखे पाटील

राज्यातील काॅँग्रेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ः विखे पाटील
राज्यातील काॅँग्रेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ः विखे पाटील

नगर ः ‘‘राज्यातील काॅँग्रेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली असून, ‘राष्ट्रवादी’च्या दावणीला बांधली आहे. जिल्ह्यात ज्यांनी काॅँग्रेसची पाठराखण केली नाही, ते आता काॅँग्रेस उभी करायला निघाले आहेत,’’ अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते व काॅँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी केली. काॅँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांना बरोबर घेऊन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

माजी आमदार स्व. जयंत ससाणे यांच्या समर्थकांची बैठक बुधवारी वडाळा महादेव (ता. श्रीरामपूर) येथे झाली. या वेळी श्री. विखे पाटील बोलत होते. या वेळी माजी उपनगराध्यक्ष संजय फंड, रामदास देठे उपस्थित होते. माजी सभापती नानासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य बाबा दिघे, बाजार समिती संचालक सुधीर नवले, सुरेश करपे, रिपब्लिकन पिपल्स पक्षाचे अशोक गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजश्री ससाणे, नगरसेविका भारती कांबळे, श्रीनिवास बिहाणी, उपस्थित होते. 

विखे म्हणाले, ‘‘आपल्यावर पक्ष कधी कारवाई करतो, यासाठी अनेकजण देव पाण्यात ठेवून आहेत. पाणी, तालुक्‍याच्या अस्मितेसाठी निर्णायक भूमिका घेऊ. काॅँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांना बरोबर घेऊन उद्या जो निर्णय घेऊ, त्याबरोबर सर्वांनी राहावे. समन्यायी पाणीवाटप कायद्यास आपला विरोध होता. त्यासाठी आपण पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता; मात्र आमदार बाळासाहेब थोरात मंत्री होते. त्यांनी त्यास विरोध केला नाही. आता ते ‘आपण कृषिमंत्री होतो, असे सांगून धादांत खोटे बोलत आहेत,’ असा आरोपही राधाकृष्ण विखे यांनी या बैठकीत केला. 

या वेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे उमदेवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा प्रचार करणार नसल्याचे या वेळी सांगण्यात आले. दरम्यान शुक्रवारी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ काॅँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी संगमनेरमध्ये सभा होत असल्याने विखे यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com