साताऱ्यात महागाईविरोधात काँग्रेसची रॅली

काँग्रेसने महागाईच्या विरोधात काढलेल्या रॅलीला सोमवारी (ता. १५) मोठा प्रतिसाद मिळाला. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी रॅलीत बैलगाडीतून सहभाग घेतला. त्यामुळे कार्यकर्तेही उत्साहात होते.
Congress rally against inflation in Satara
Congress rally against inflation in Satara

कऱ्हाड, जि. सातारा ः भाजप हटाओ, देश बचाओ..., पेट्रोल डिझेलचे दर कमी झालेच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, पृथ्वीराज बाबा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है..., अशा घोषणांनी शहरातील परिसर दणाणून गेला. काँग्रेसने महागाईच्या विरोधात काढलेल्या रॅलीला सोमवारी (ता. १५) मोठा प्रतिसाद मिळाला. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी रॅलीत बैलगाडीतून सहभाग घेतला. त्यामुळे कार्यकर्तेही उत्साहात होते. 

काँग्रेसतर्फे महागाई विरोधात जनजागरण अभियान सुरू झाले. त्याचाच एक भाग म्हणून शहरात काँग्रेस पक्षाची महागाई विरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, सहप्रभारी निखिल कवीश्वर, शहराध्यक्ष राजेंद्र माने, मनोहर शिंदे, मलकापूर नगराध्यक्षा नीलम येडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य बंडानाना जगताप, विद्याताई थोरवडे, नितीन थोरात, नरेंद्र पाटील, इंद्रजित चव्हाण, नगरसेवक इंद्रजित गुजर, सागर जाधव, काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाअध्यक्ष झाकिर पठाण, जावेद शेख, गणेश गायकवाड अमीर कटापुरे यांच्यासह महिला उपस्थित होते. 

कोल्हापूर नाका येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली. मुख्य बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वळसा घालून रॅलीचा समारोप येथील तहसीलदार कार्यालयासमोर झाला. तेथे रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार रॅलीचे आयोजन केले होते. पंधरा दिवस अभियान राबविले जाणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याव्दारे केंद्रामुळे निर्माण झालेली महागाई व अर्थव्यवस्थेची दुरवस्थेची माहिती जनतेपर्यंत पोचवली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com