लोकसभेसाठी काँग्रेसची उमेदवार निवड प्रक्रिया सुरू

लोकसभेसाठी काँग्रेसची उमेदवार निवड प्रक्रिया सुरू
लोकसभेसाठी काँग्रेसची उमेदवार निवड प्रक्रिया सुरू

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. काँग्रेसच्या संसदीय निवड मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत इच्छुक उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून संभाव्य तीन उमेदवारांच्या नावाची शिफारस केंद्रीय निवड समितीला करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ''टिळक भवन'' येथे संसदीय निवड मंडळाची बैठक पार पडली. आगामी निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी आहे. आघाडीत काँग्रेसकडे असलेल्या २६ मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या नावावर झाली. मतदारसंघनिहाय चर्चा झाल्यानंतर प्रत्येकी तीन नावांची शिफारस दिल्लीला करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, या बैठकीत मुंबईतील पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाबाबत चर्चा झाली. काँग्रेसकडे दक्षिण मुंबईतून माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांचा एकमेव अर्ज आला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारांवर फारशी चर्चा झाली नाही. दिवंगत गुरुदास कामत यांनी नेतृत्व केलेल्या मुंबई वायव्य मतदारसंघातून या वेळी मुंबई अध्यक्ष संजय निरूपम हे इच्छुक आहेत. मात्र, निरूपम यांच्या उमेदवारीला मुंबईतील अन्य नेत्यांचा विरोध आहे. निरूपम हे २००९ च्या निवडणुकीत उत्तर मुंबईतून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी मतदारसंघ बदलू नये. मुंबई अध्यक्षांनी मतदारसंघ बदलला तर चुकीचा संदेश जाईल, असा युक्तिवाद निरूपम विरोधकांनी बैठकीत केल्याचे समजते. यामुळे मुंबई वायव्यसह उत्तरमध्य मुंबईतील उमेदवारांच्या नावावरील चर्चा पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, वायव्य मुंबईतून माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी खासदार प्रिया दत्त यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने उत्तर-मध्य मुंबईतून माजी मंत्री नसीम खान, कृपाशंकर सिंह, अभिनेत्री नगमा, माजी क्रिकेट कसोटीपटू महंमद अझरुद्दीन, हुसेन दलवाई आदी इच्छुक आहेत. तर दक्षिण-मध्य मुंबईतील उमेदवारीसाठी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्यासह डॉ. भालचंद्र मुणगेकर, उत्तम खोब्रागडे यांच्यात चुरस आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com