agriculture news in Marathi congress support to bharat band Maharashtra | Agrowon

शेतकरी संघटनांच्या भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा : नाना पटोले 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 मार्च 2021

शेतकरी संघटनांनी शुक्रवारी (ता. २६) भारत बंदची हाक दिली असून या भारत बंदला काँग्रेस पक्ष सक्रिय पाठिंबा देत राज्यभर उपोषण करणार आहे.

नागपूर : शेतकरी संघटनांनी शुक्रवारी (ता. २६) भारत बंदची हाक दिली असून या भारत बंदला काँग्रेस पक्ष सक्रिय पाठिंबा देत राज्यभर उपोषण करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. 

यासंदर्भात नाना पटोले पुढे म्हणाले की, शेतकरी संघटनांच्या बंदला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाच्या वतीने २६ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत राज्य, विभाग, जिल्हा व तालुका मुख्यालयी उपोषण करण्यात येणार आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, ज्येष्ठ काँग्रेस नेते व मंत्र्यांसह मी मुंबईत उपोषणाला बसणार आहे तर कार्याध्यक्ष हे विभागाच्या मुख्यालयी उपोषणाला बसणार आहेत.  

यात नागपूर येथे  चंद्रकांत हांडोरे,अमरावतीत कुणाल पाटील, औरंगाबाद येथे शिवाजीराव मोघे, पुणे  यथे बस्वराज पाटील, नाशिकमध्ये  प्रणिती शिंदे तर ठाण्यात नसिम खान पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसणार आहेत. 

इंधनावर अव्वाच्या सव्वा कर लावून केंद्र सरकार दिवसाढवळ्या लोकांच्या खिशावर दरोडा टाकत आहे. पेट्रोल १०० रुपये लिटर तर गॅस सिलिंडर ८५० रुपयांवर झाला आहे. महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगार देशोधडीला लागणार आहेत, असे पटोले म्हणाले. 

शेतकऱ्यांशी चर्चेचा केवळ देखावा 
काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर मागील १०० दिवसांपापेक्षा जास्त दिवस ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. मोदी सरकारने सुरुवातीला चर्चेचा देखावा केला, पण तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मात्र मान्य केली नाही. कृषी कायद्यातील बदलांमुळे रेशनिंग बंद होणार आहे. त्यामुळे गोरगरीब जनता कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे. मात्र हिटलरशाहीवृत्तीचे मोदी सरकार यावर बोलायलाही तयार नाही. 
 


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...